नाशिकमध्ये गणपती मिरवणुकीचा जल्लोष

मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

परतीचा व्हावा पाऊस - महाजन
राज्याच्या विविध भागांमध्ये यंदा पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने गणेश भक्त खूश आहेत. आता परतीच्या पावसानेही राज्यावर मेहरबानी करावी, अशी आराधना गणपतीच्या चरणी केली असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

नाशिक : नाशिकमध्ये हर्सुल नाका गणरायाच्या निरोपासाठी मुख्य मिरवणुकीला दुपारी साडेबारा सुरू झाली. वाकडीबारव येथून पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसे, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समितीचे सभापती शिवाजीराव गांगुर्डे, आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढविण्यात आला. महापालिकेचा मानाचा गणपती अग्रभागी असून, मिरवणुकीत अठरा मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. आणखी मंडळ या मिरवणुकीत दाखल होत आहेत. 

गणपतीची मिरवणूक रात्री उशीरापर्यंत चालेल. सर्वोच्च न्यायालयाने डीजेला परवानगी दिली असल्याने अनेक मंडळांनी रोषणाईसह डीजेचे रथ मिरवणुकीत सहभागी केले आहेत. नाशिकचा ढोल आसमंत दुमदुमून सोडत आहे.

परतीचा व्हावा पाऊस - महाजन
राज्याच्या विविध भागांमध्ये यंदा पावसाने चांगली हजेरी लावली असल्याने गणेश भक्त खूश आहेत. आता परतीच्या पावसानेही राज्यावर मेहरबानी करावी, अशी आराधना गणपतीच्या चरणी केली असल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितले.

Web Title: Nashik news Ganpati visarjan in Nashik