सीसीटीव्ही कॅमेरे इतरत्र फिरवून केली चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

घोटी (नाशिक): सिन्नर घोटी महामार्गावरील साकुर फाटा येथे मध्यरात्री दरम्यान सई रेडिमेड कलेक्शन येथे धाडसी चोरी करून तब्बल चार लाख रुपयांचा माल व एक हजार रुपये रोख रक्कम यांसह एलईडी स्क्रीन टीव्ही लंपास झाल्याचे दुकानाचे मालक अशोक सहाणे यांनी सांगितले.

शटर तोडून दुकानातील महागडे कपडे, चोरी करून सीसीटीव्ही कॅमे-यावर प्लास्टिक आवरण लावून, तर काही सीसी टीव्ही कॅमेरे इतरत्र दिशा फिरवून देण्यात आली, वाडीव-र्ह पोलिस ठाण्याशी संपर्क करताच साहायक पोलिस निरीक्षक श्री. पळे यांनी तातडीने परिसराची पाहणी डॉगस्कोडला पाचारण करण्यात आले आहे. महामार्ग लगत परिसरात भुरट्या चोऱ्या वाढताना दिसत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.