पारधी समाज आजही समतेपासून वंचित - प्रभुणे

पारधी समाज आजही समतेपासून वंचित - प्रभुणे

नाशिक - पारधी समाजातील अनेक कार्यकर्ते आता स्वतःच्या पायावर उभे राहून चळवळीत स्वतंत्रपणे काम करताहेत. या समाजातील मुले आज शासकीय अधिकारी, राजकारणात महत्त्वाची पदे भूषवत असली, तरी अजूनही हा समाज समतेपासून वंचित असल्याचेच चित्र आहे, असे मत समरसता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. 

डॉ. कुर्तकोटी सभागृहात समरसता साहित्य परिषद व सामाजिक समरसता मंच यांच्यातर्फे समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने अध्यक्षस्थानी होते. व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रा. डॉ. कमल आहेर-कुवर, समरसता साहित्य संमेलनाचे निमंत्रक संजय साळवे उपस्थित होते. या वेळी श्री. महामिने यांच्या हस्ते श्री. प्रभुणे यांचा सत्कार करण्यात आला. 

श्री. प्रभुणे म्हणाले, की पारधी समाजाविषयी मी जे लेखन केले आहे, त्यात शंभर टक्के समाजाचे प्रतिबिंब उमटले नाही. या कादंबरीत इतर समाजाचेही चित्रण आहे. त्याचेही वास्तव भयानक आहे. भटक्‍या विमुक्तांच्या पालांमध्ये आजही अनेक संघ स्वयंसेवक घरातल्या धान्यातील वाटा देऊन त्यांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. अजूनही या समाजापर्यंत समता पोचलेली नाही. त्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. 

प्रा. आहेर म्हणाल्या, की ‘पारधी’ वाचले तेव्हा प्रभुणे यांचे व्यक्तिमत्त्व मनापर्यंत पोचले. सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या काळात गिरीशजींसारखा माणूस समरसतेचे कार्य करतो, हे महत्त्वाचे आहे. पारध्यांमध्ये अविरत काम करून त्यांच्यात परिवर्तन करण्याचे काम केले आहे.  

श्री. महामिने म्हणाले, की प्रभुणे यांनी भटक्‍या विमुक्तांसाठी आयुष्य झोकून दिले. कुठल्याही प्रसिद्धीचा त्यांना हव्यास नाही. पारधी पुस्तक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही पारधी समाजाचीही आत्मकथा आहे, असेही म्हणता येईल. नाना बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com