शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नाशिक रोड - शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी देऊन राज्य शासनाने फसवणूक केली असून, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. याशिवाय मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेचे किशोर चव्हाण यांनी दिला. 

विहितगाव, वडनेर दुमाला मार्गावरील साईग्रॅंड लॉन्स येथे छावा संघटनेतर्फे मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्‍तीसाठी नुकताच मेळावा झाला. त्या वेळी चव्हाण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की आता संपूर्ण मराठा समाज आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकवटला आहे. शासनाने वेळ न लावता मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे. दीड लाख रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांची फसवणूक असून, सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आम्हाला ही कर्जमाफी मंजूर नसून सरसकट कर्जमुक्‍ती हवी आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात. प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर, तानाजी उसेकर, सतीश देशमुख, अशोक खानापुरे, गणेश वाघ, शुभम मुळाठ, विजय खर्जुल, दिव्या ठक्‍कर आदी उपस्थित होते.