चिकन खाणाऱ्यांच्या खिशाला 'जीएसटी'ची बसतेय कात्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नाशिक - वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) भार ब्रॉयलर चिकन खाणाऱ्या ग्राहकांच्या खिश्‍यावर पडला आहे. एका ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्याला लागणाऱ्या जादा पैशांमुळे कोंबडीमागे ग्राहकांना आता दोन रुपये अधिकचे मोजावे लागतात.

सोयाबीन, कापूस, शेंगदाण्याच्या खाद्याच्या ढेपेसाठी पूर्वी महसुली कराची आकारणी करण्यात येत नव्हती. आता पाच टक्के जीएसटी आकारण्यात येतो. तसेच, खाद्यातील औषधांसाठी पाच ते बारा टक्के जीएसटी द्यावा लागतो. अशा पद्धतीने ब्रॉयलर कोंबडीच्या खाद्याच्या खर्चात किलोला पन्नास पैशांची भर पडली आहे. खाद्याची किंमत 24 रुपयांवरून 24 रुपये 50 पैसे किलो झाली आहे. एका कोंबडीला चार किलो खाद्य लागते. त्यावरून कोंबडीच्या किमतीत झालेल्या वाढीचा अंदाज येतो.

खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या भांड्यांसाठी पूर्वी पाच टक्के महसुली कराची आकारणी व्हायची. आता 12 टक्के जीएसटी द्यावा लागतो. नाशवंत माल म्हणून अंडी, कोंबडी, पिले यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच जीएसटीमधूनही कराची सवलत मिळाली आहे.

Web Title: nashik news GST