महापौरांकडून आरोग्य विभागाची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नगरसेवकांकडून औषध फवारणीचे प्रमाणपत्र बंधनकारक; दंडात्मक कारवाईचा उगारला बडगा

नाशिक - सणासुदीच्या प्रारंभीच शहरात डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू व साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. यामुळे महापौर रंजना भानसी यांनी आज आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत खरडपट्टी काढली.

शहरात औषधे, धूर फवारणी होत नाही, तसेच बोगस फवारणी होत असल्याचा दावाच महापौरांनी करत जेथे फवारणी झाली आहे त्या भागातील नगरसेवकांचे प्रमाणपत्र आणा अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा दिला. 

गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महापौर भानसी यांनी महापौर कार्यालयात तत्काळ आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक घेतली. उपमहापौर प्रथमेश गिते, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, मलेरिया विभागप्रमुख डॉ. राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. महापौरांना नगरसेवक व नागरिकांकडून तक्रारी मिळत असल्याने त्याचा आधार घेत त्यांनी आरोग्य विभागावर तोंडसुख घेतले. 

शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कुठेही फवारणी होत नाही आदी प्रश्‍नांवर त्यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. किती नगरसेवकांना विचारून फवारणी केली. केली असेल, तर आताच फोन लावण्याचे आव्हान दिल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नव्हते. शहर स्वच्छतेबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नाही. फक्त कागदे रंगविण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

अधिकार असतानाही महापौरांचे आरोप
महापालिकेत महापौर महत्त्वाचे पद असते. अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा अधिकार असताना महापौर भानसी यांनीच आरोग्य विभागावर तोंडसुख घेत अनेक आरोप केले. घरोघरी होणारी औषध फवारणी बोगस आहे. किरकोळ प्रकारची फवारणी होत असल्याचे दाखवून औषधांची बिले काढली जातात, असा आरोप करण्याऐवजी अधिकारात त्यांनी चौकशी लावण्याची आवश्‍यकता होती. पण महापौरांनी फक्त आरोपांवरच समाधान मानले.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर ठाणे अंमलदाराकडून तक्रार दाखल करून घेतली जाईलच याची खात्री नसते....

01.27 AM

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील आरोग्य केंद्रात रुग्णांसह ग्रामस्थांना अजूनही पुरेशा...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017