बिबट्याचे दर्शन झाल्याने मखमलाबाद शिवारात पिंजरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नाशिक -  मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात किरण पिंगळे यांच्या वस्तीलगतच्या जक्कीशेठ कोकणी यांच्या शेतात दोन बिबटे दिसल्याने खळबळ उडाली. सोमवरी  (ता. २८) रात्री आठच्या सुमारास परिसरातील मजुरांना या ठिकाणी दोन बिबटे दिसले. मखमलाबाद परिसरात आज सायंकाळी वन विभागातर्फे पिंजरा लावण्यात आला. 

मखमलाबादला गंगावाडी परिसर मळे वस्तीचा आहे. या परिसरात दाट झाडीही आहेत. परिसरात काल बिबट्या दिसून आला. त्या ठिकाणी पायाचे ठसेही असल्याने वन विभागातर्फे पिंजरा लावण्यात आला. सातत्याने बिबट्याचे दर्शन घडत असल्यामुळे वन विभागाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

गेल्या आठवड्यात तारवालानगर, मेरी परिसर, तसेच जलविज्ञान भवन या ठिकाणी काही नागरिकांना बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. जलविज्ञान भवन परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. तसेच या ठिकाणी कुत्रे मारल्याचे दिसून आले. त्यामुळे वन विभागातर्फे परिसरात पिंजरा लावला होता. आठ दिवसांपासून पिंजरा ठेऊनही तेथे बिबट्या फिरकला नाही. त्यानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याने तोच पिंजरा आता मखमलाबाद शिवारात बसविला आहे. 

गेल्या आठवड्यात मेरी परिसरात बिबट्या आल्याची चर्चा होती. तेव्हा त्या परिसरात पिंजरा बसविण्यात आला. काल रात्रीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. आज मखमलाबाद शिवारातील गंगावाडी परिसरात पिंजरा बसविला आहे. बिबट्या पकडण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 
- प्रशांत खैरनार, वनपरिक्षेत्र अधिकारी 

काल बिबट्यासोबत एक बछडाही होता. सुमारे एक तास तो एकाच ठिकाणी होता. वन विभागाला याची माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारीही आले. परंतु अंधार, पाऊस, तसेच दाट झाडीमुळे शोध घेता आला नाही. सातत्याने या भागात बिबट्या दिसत असल्याने तातडीने वन विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 
- किरण पिंगळे,  मखमलाबाद, प्रत्यक्षदर्शी

टॅग्स