शिंगवे येथे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले सुखरूप

संजय भागवत
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

वनविभागाचे पथक येई पर्यंत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.फोटो काढण्यात चड़ाओढ लागली होती.रात्री केव्हा तरी बिबट्या विहिरीत पड़ला असल्याने पाण्याने गारठला होता.विहिरील पाइपाचा आधार घेत कसातरी तग धरून बसला होता.त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एक लाकड़ी फळी दोराच्या साह्याने विहित सोडून त्याला बसण्साठी सोय केली.

सायखेड़ा : शिंगवे ता.निफाड़ येथील माळवाडी शिवारात दिड़ ते दोन वर्षाचा बिबट्या पहाटे आज शनिवार ( ता.9) रोजी विहिरीत पड़ला.वनखात्याने स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला पिंजर्यात जेरबंद करून सुखरूप बाहेर काढले.

शिंगवे शिवारात शांताराम वाघ हे शेतात वस्तीवर राहतात.घराशेजारील गट नंबर 807 क्षेत्रात विहिर आहे. सावजाचा पाटलाग करतांना रात्री कधीतरी बिबट्या विहिरीत पड़ला .कोणाच्याही ते लक्षात आले नाही.सकाळी सहा वाजता शांताराम वाघ यांच्या पत्नी लक्ष्मीबाई  अंगण झाड़त असतांना त्यांना विहिरीतून आवाज आला.कसला आवाज येतो हे पाहण्यासाठी त्यांनी घराशेजारील विहिरीत डोकावून पाहिले असता.त्यांना बिबट्या दिसला.त्यांनी पतीला सांगितले.शांताराम यांनी शेजारच्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे सांगितले.त्यांनतर तातड़ीने वनविभागाला कळविले.

वनविभागाचे पथक येई पर्यंत बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.फोटो काढण्यात चड़ाओढ लागली होती.रात्री केव्हा तरी बिबट्या विहिरीत पड़ला असल्याने पाण्याने गारठला होता.विहिरील पाइपाचा आधार घेत कसातरी तग धरून बसला होता.त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी एक लाकड़ी फळी दोराच्या साह्याने विहित सोडून त्याला बसण्साठी सोय केली.

त्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्रपाल संजय भंड़ारी वनपाल प्रसाद पाटील, वनसेवक व्हि.आर.टेकनर.आर.के.दौंड, एस सोनवणे, वनसेवक  लोंड़े, शेख, आहिरे,  भारत माळी, पिंटू निहारे, दर्शन दराड़े घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंजरा विहिरीत सोडून पिजर्यात बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.त्यानंतर बिबट्याला निफाड़ येथे नेण्यात आले.

बिबट्या विहिरीतुन काढतांना विहिरीचे कठड़े तुटले.त्यामुळे माजी सरपंच प्रभाकर रायते यांच्यासह ग्रामस्थांनी वनविभागाच्या आधिकारी व कर्मचारी यांना घेराव घालत शेतकर्यांला नुकसान भरपाई द्या अन्यथा येथून जावू देणार नाही अशी भूमिका घेतली.वनपरिक्षेत्रपाल भंडारी यांनी ग्रामस्थांची समजूत काढत पंचनामा करून विहिर मालक शेतकर्याला नुकसान भरपाई देवू असे अश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी वन आधिकार्यांना जावू दिले.

शिंगवे परिसरात बिबट्यांची अनेक वर्षापासून दहशत आहे.जनावरांवर बिबट्याचे हल्ले नेहमीचेच झाले आहे. लहान बालकांचे बिबट्याने बळी घेतले आहे.

जीव धोक्यात घालून शेतकरी शेतात कामे करत असतात .सायखेड़ा येथे वनविभागाचे कार्यालय होणे गरजेचे आहे तसेच कायमस्वरूपी वनकर्मचार्यांची नेमणूक होणे गरजेचे असतांना वनविभाग टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.