भारनियमनाचे खापर पावसावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक - राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. कोळसाटंचाईची ही स्थिती अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे उद्‌भवल्याचा दावा करत महानिर्मिती कंपनीने भारनियमन व कोळसाटंचाईचे खापर राज्यातील पावसावर फोडले आहे. 

नाशिक - राज्यातील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. कोळसाटंचाईची ही स्थिती अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे उद्‌भवल्याचा दावा करत महानिर्मिती कंपनीने भारनियमन व कोळसाटंचाईचे खापर राज्यातील पावसावर फोडले आहे. 

राज्यात महानिर्मितीच्या सात वीज केंद्रांची दहा हजार मेगावॉट क्षमता आहे. त्यासाठी दरवर्षी ४६.९२ दशलक्ष टन कोळसा व जुन्या संचासाठी ब्रिज लिंकद्वारे मिळणारा ९.१८ दशलक्ष, असा ५६ दशलक्ष टन कोळसा लागतो. ३१ जुलैला ३१.८२ लाख टन कोळसा होता. विजेची मागणी कमी असल्याने मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रणालीनुसार काही संच बंद ठेवण्यात आले. परळी केंद्रातील वीजनिर्मिती बंद असल्याने २२ दिवसपुरेल एवढा कोळसा होता; पण सप्टेंबरपासून विजेची मागणी वाढली आहे. तेव्हापासून कंपनीने सहा हजार मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती वाढवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये ३१० दशलक्ष युनिट, जुलैत ६३२.४१, तर ऑगस्टमध्ये १३५३.६३ दशलक्ष युनिट याप्रमाणे २२९६.५६ दशलक्ष युनिट जास्तीची वीजनिर्मिती केली आहे.

वीजनिर्मिती कंपनी २०१७-१८ आर्थिक वर्षातील कोळसापुरवठ्याबाबत कोल इंडियाच्या संपर्कात आहे. राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन जास्त वीजनिर्मितीसाठी महानिर्मिती कंपनी सर्वच कोळसापुरवठादारांच्या संपर्कात आहे; पण यंदा काही भागात अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कोळसापुरवठ्यात अडचणी येत आहे. तथापि, महानिर्मितीच्या वीज केंद्रांना पुरेसा कोळसा पुरविण्यासाठी सर्व कोळसा कंपन्या प्रयत्न करत आहेत.

महानिर्मितीची औष्णिक वीजकेंद्रे : ७
महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता : १० हजार मेगावॉट
वीजनिर्मितीसाठी आवश्‍यक कोळसा : ५६ दशलक्ष टन
३१ जुलैअखेर उपलब्ध कोळसा : ३१.८२ लाख टन
महानिर्मितीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता : १० हजार मेगावॉट
जून, जुलै व ऑगस्टमधील वीजनिर्मिती : २ हजार २९६ दशलक्ष युनिट

कृषिपंपाला आठ तास वीज
राज्यात कृषिपंपासाठी रात्री दहा तास वीजपुरवठा केला जात होता. तो आता दोन तासांनी घटवून आठ तास करण्यात येणार आहे.

१५,९९७ - मेगावॉट राज्याची मागणी
११,४८५ - मेगावॉट राज्याची निर्मिती
४,५१२ - मेगावॉट तुटवडा

वीज केंद्र    बंद संच    कधीपासून    कारण
भुसावळ    १ संच २१०    २७ ऑगस्ट    कोळसा टंचाई
चंद्रपूर    ३ संच ३१०    २२ ऑगस्ट    कोळसा टंचाई
चंद्रपूर    १ संच ५००    ९ सप्टेंबर    ट्यूब लिकेज 
खापरखेडा    १ संच २१०    ८ सप्टेंबर    इंधन समस्या
खापरखेडा    १ संच २१०    १३ सप्टेंबर    व्हॉल्व ट्यूब
खापरखेडा    १ संच    १ सप्टेंबर    टर्बाइन व व्हॉल्व
कोराडी    संच ६ ते १०    ७ सप्टेंबर    एयर प्रेशर प्रॉब्लेम
नाशिक    २१० चे ३ संच    १० ऑगस्ट    देखभाल दुरुस्ती
परळी    ३ संच    १७ जून    देखभाल दुरुस्ती

Web Title: nashik news loadshading