नाशिकमध्ये जावयाकडून सासू व भाच्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नाशिक - पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंधारवाडी वस्तीमध्ये जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षांच्या मुलाची कोयत्याने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

नाशिक - पंचवटीतील मखमलाबाद शिवारातील गंधारवाडी वस्तीमध्ये जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षांच्या मुलाची कोयत्याने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

संशयित मोतीराम बदादे याने राहत्या घरून सासू मंदाबाई दशरथ खराटे (वय 55) व मेव्हणीचा मुलगा नैतिक विशाल लिलके (वय 8) यांना दुचाकीवरून रामवाडीच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या जंगलात आमिष दाखवून नेले आणि त्यांचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केला. त्यानंतर मोतीराम याने दुचाकीवरून पुन्हा सासूचे घर गाठले आणि सासरे दशरथ सोनू खराटे यांना सासूची लूटमार होत असल्याचे खोटे सांगून दुचाकीवर बसवून घटनास्थळावर आणले. त्यांच्यावरही त्याने प्राणघातक हल्ला केला. यात गंभीर मार लागल्याने ते सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या दिशेने पळाले. पोलिस तातडीने घटनास्थळ पोचले. तसेच पंचवटी पोलिसांनाही माहिती दिली. बदादे घटनास्थळावरून फरारी झाला आहे. पंचवटी पोलिस त्याच्या मागावर आहेत.