मद्यविक्रीचे समर्थन कदापि नाही - महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक -  मद्यविक्रीला आमचे कदापि समर्थन नाही. दारूविक्री दुकाने सुरू करण्यास आमचा कायमच विरोधच राहणार आहे. याप्रश्‍नी आम्ही आयुक्तांची भेट घेऊ. तथापि, राज्य शासनाकडेही प्रस्ताव पाठवून विरोध दर्शविणार असल्याचे मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले. नाशिक महापालिका हद्दीतील त्र्यंबकेश्‍वर आणि दिंडोरी रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयास महापालिकेच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे आज महापौरांनी यावर आपले मत व्यक्त करताना या निर्णयासंदर्भात आपण आपला निर्णय राज्य शासनाकडे पाठविणार आहोत.

नाशिक -  मद्यविक्रीला आमचे कदापि समर्थन नाही. दारूविक्री दुकाने सुरू करण्यास आमचा कायमच विरोधच राहणार आहे. याप्रश्‍नी आम्ही आयुक्तांची भेट घेऊ. तथापि, राज्य शासनाकडेही प्रस्ताव पाठवून विरोध दर्शविणार असल्याचे मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले. नाशिक महापालिका हद्दीतील त्र्यंबकेश्‍वर आणि दिंडोरी रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयास महापालिकेच्या अनेक सदस्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे आज महापौरांनी यावर आपले मत व्यक्त करताना या निर्णयासंदर्भात आपण आपला निर्णय राज्य शासनाकडे पाठविणार आहोत. दारू दुकाने सुरू करण्यास माझ्यासह शहराध्यक्षांचाही विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांची घेणार भेट
राज्य शासनाच्या रस्ता हस्तांतरण करण्याच्या निर्णयाला माझा विरोध असल्याचे वक्तव्य महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले. या प्रश्‍नांवर आम्ही सर्व महापालिका आयुक्त व पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार आहोत. त्यांना निवेदन देऊ, असे श्री. पाटील यांनी सांगितले.