दोनशे कोटींच्या कामांना विकासनिधीसाठी कात्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

नाशिक - शहरातील विकासकामांसाठी नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या ९५ कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रशासनाकडून २०० कोटींच्या विकासकामांना कात्री लावली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांचा निधीचा मार्ग मोकळा होईल. 

नाशिक - शहरातील विकासकामांसाठी नगरसेवकांना देण्यात येणाऱ्या ९५ कोटी रुपयांच्या निधीसाठी प्रशासनाकडून २०० कोटींच्या विकासकामांना कात्री लावली जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांचा निधीचा मार्ग मोकळा होईल. 

प्रभागातील विकासकामांच्या दृष्टीने ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यासाठी महापौर, उपमहापौर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे याबाबत साकडे घातले होते. त्यानुसार आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करीत निधी देण्यासाठी विनामंजूर, निविदा नसलेली २०० कोटींची कामे कपात करण्याचे सुचविले होते. यावर दोन दिवसांत कामांची यादी देण्याचेही नगरसेवकांना सांगितल्यावर सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शवत आयुक्तांना या कामांबाबत यादी दिली होती. त्यानुसार प्रशासनाकडून ९५ कोटींच्या निधीसाठी आज २०० कोटींच्या विनामंजूर आणि निविदा नसलेल्या कामांना कात्री लावण्यात आली. यात शहरातील अनेक प्रभागामधील छोट्या आणि मध्यम विकासकामांचा समावेश आहे. एकाच प्रकल्पासाठी दोन प्रस्ताव असलेल्या कामांनाही कात्री लावण्यात आली.