महामार्ग हस्तांतराविरोधात ‘रामायण’समोर घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक - राज्यातील महामार्ग महापालिकांकडे हस्तांतरित करण्याचा आणि दारूबंदीच्या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य दारूबंदी जनआंदोलनातर्फे तीव्र विरोध दर्शविण्यात आला. त्यानंतर महापौरांना निवेदन देण्यात आले. या निर्णयाविरोधात आज संघटनेतर्फे महापौरांच्या ‘रामायण’ बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. हा निर्णय महापालिकेने स्वीकारला तर याविरोधात शहरात घंटानाद आंदोलनाबरोबरच सह्यांची मोहीम राबविण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष गणेश कदम यांनी दिला. 

शासन निर्णयाने नाशिक महापालिका हद्दीतील त्र्यंबकेश्‍वर आणि दिंडोरी रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे २९ दारू दुकाने सुरू होणार आहेत. हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखेच आहे. भाजपने जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याने या निर्णयाविरोधात शहरात राज्य दारूबंदी जनआंदोलन समिती दारूबंदीसाठी सह्यांची मोहीम राबविणार आहे. 

या वेळी कार्याध्यक्ष माधवी पाटील, तुषार भोसले, यश बच्छाव, संदीप मुठाळ, सागर बैरागी, श्‍याम राऊत, संजय बर्वे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.