महापालिकेला वसुलीतून 22 कोटी अधिक प्राप्त 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक - घरपट्टी, पाणीपट्टी व बांधकाम शुल्काच्या माध्यमातून गेल्या वर्षाच्या तुलनेत घसघशीत वाढ झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतून तब्बल 22 कोटी रुपये अधिक प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरअखेरपर्यंत 45 कोटी रुपये घरपट्टी वसुली झाली, तर या वर्षी 12 कोटी 58 लाख रुपये अतिरिक्त मिळाले. पाणीपट्टीत गेल्या वर्षाच्या तुलनेत नऊ कोटींनी वाढ झाली. थकबाकीदारांना पाठविलेल्या नोटिसा, ऑनलाइन कर भरण्याची सुविधा व पहिल्या आर्थिक तिमाहीत दिलेली सवलत याचा सकारात्मक परिणाम वसुलीवर झाला आहे. 

विविध कर विभागामार्फत करवसुली केली जाते. दोन वर्षांत उद्दिष्टपूर्ती करताना या विभागाची दमछाक झाली होती. यंदा मात्र विविध योजना राबवून गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक वसुली करण्यात आली. 1 एप्रिल ते ऑक्‍टोबर 2016 या कालावत 45 कोटी 18 लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा एप्रिल ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत 57 कोटी 76 लाखांची वसुली झाली. शहरातील 67 हजार बड्या पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटीस बजावल्याने पाणीपट्टी वसुलीत वाढ झाली. मागील वर्षी 1 एप्रिल ते ऑक्‍टोबरदरम्यान दहा कोटी 67 लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली होती. या वर्षी एप्रिल ते ऑक्‍टोबरदरम्यान 19 कोटी 97 लाख रुपये प्राप्त झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल नऊ कोटी 29 लाख रुपये अधिक महसूल प्राप्त झाला. ऑनलाइन करभरणा, एप्रिल, मे व जून महिन्यात कर भरल्यास अनुक्रमे पाच, तीन व दोन टक्के सवलत योजनेचा फायदा महापालिकेला मिळाला. सवलती व ऑनलाइनमुळे 34 कोटी 75 लाख रुपये प्राप्त झाले. 41 हजार 821 लोकांनी ऑनलाइन कर भरला आहे. 

...अन्यथा गुन्हा दाखल  
महापालिकेने थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत. पंधरा दिवसांत थकबाकी भरण्याच्या सूचना देऊनही अनेकांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे महापालिकेतर्फे पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा अधिकारी गेल्यानंतर पुन्हा नळजोडणी केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. 

टॅग्स