उन्हाळ कांद्याला दीड हजार रुपये भाव 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

पिंपळगाव बसवंत - परराज्यांतील कांदा संपल्याने पुरवठ्याची भिस्त महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यावर असल्याने उन्हाळ कांद्याच्या दराने दोन वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. गेल्या महिनाभरापासून तेजीत असलेल्या कांद्याने गुरुवारी मोठी उसळी घेतली असून, प्रतिक्विंटल बाजारभाव तब्बल दीड हजार रुपयांपर्यंत झेपावला. टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याचेही भाव वधारल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

गेल्या वर्षभरापासून कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढाच भाव मिळत होता. त्यात उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा पिकाचा व्यवहार आतबट्ट्याचा ठरत होता. नोटाबंदीनंतर तर कांद्याचे दर अधिकच गडगडले. मात्र गेल्या महिनाभरापासून बाजारभावाला पूरक स्थिती निर्माण झाली. दिल्ली, पंजाबसह दक्षिणेकडील राज्ये आणि मलेशिया, कोलंबो, सिंगापूर या देशांमध्ये कांद्याचा पुरवठा करण्याची मदार नाशिक जिल्ह्यावर आहे. मोठ्या कालखंडानंतर मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने कांद्याच्या दराला झळाळी मिळाली आहे. यापूर्वी 2015 मध्ये कांद्याला प्रतिक्विंटल दीड हजार रुपये भाव मिळाला होता.