मंदिराला प्रदक्षिणा मारून केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

नाशिक रोड - जेल रोड परिसरातील मनोरुग्णाने आज पहाटे विचित्र पद्धतीने आत्महत्या केली. सुभाष रामराव डोईफोडे (वय ५८) असे या मनोरुग्णाचे नाव असून, त्याने प्रथम अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले व नंतर ब्लेडच्या सहाय्याने हाताच्या नसा कापून शेजारीच असलेल्या मंदिरावर रक्त शिंपडले. यात शंभर टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

जेल रोड परिसरातील मॉडेल कॉलनीत आविष्कार सोसायटीमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यात सुभाष डोईफोडे याने राहत्या घरात अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. तिसऱ्या मजल्यावरून पेटलेल्या अवस्थेत खाली उतरून शेजारीच असलेल्या विघ्नहर्ता गणपती मंदिराच्या आवारात प्रवेश केला. तेथे ब्लेडच्या सहाय्याने दोन्ही हातांच्या नसा कापल्या. हातातून रक्त पडू लागताच त्याने मंदिराच्या चारही बाजूने फेऱ्या मारत रक्त शिंपडले. त्या वेळी त्याच्या घरातील सदस्यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. मात्र, आगीमुळे कोणीही जवळ जाण्याचे धाडस केले नाही. 

नागरिकांनी तातडीने ही माहिती नाशिक रोड पोलिसांना कळविली. माहिती मिळताच नाशिक रोडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिटको हॉस्पिटलचे वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले. परंतु आगीत गंभीर भाजलेल्या सुभाष डोईफोडेचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी नंतर पाण्याच्या सहाय्याने मंदिराचा परिसर स्वच्छ केला.