गुवाहाटी, कामाख्याच्या फेऱ्या पुरामुळे तीन दिवसांसाठी रद्द

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नाशिक - आसाममधील महापुरामुळे उत्तर पूर्व मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. त्याचा मध्य रेल्वेच्या मार्गावरही परिणाम झाला आहे.

उत्तर रेल्वेच्या गुवाहाटी आणि कामाख्या या दोन रेल्वे गाड्या 20 ऑगस्टपर्यंत रद्द केल्या आहेत.

ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुराने ईशान्येसह पूर्वेकडील राज्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. उत्तर रेल्वेच्या अनेक मार्गावर पाणी असल्याने दूरपल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे ईशान्येकडील भागाशी जोडणाऱ्या उत्तर रेल्वेच्या रेल्वेगाड्या मुंबईपर्यंत पोचू शकणार नाहीत. त्याची मुंबई ते भुसावळ आणि खांडवापर्यंतच्या सगळ्या रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांना झळ बसणार आहे.