'भुजबळ जेल से छोडो' आंदोलन राबवा - राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नाशिक - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत सुरू असलेले "भुजबळ समर्थक जोडो' अभियान राबविण्याऐवजी "भुजबळ जेल से छोडो' आंदोलन राबवा, असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. नाशिक जिल्ह्यातील भुजबळ समर्थकांनी कृष्णकुंज निवासस्थानी राज यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार जयवंत जाधव आदींचा राज यांना भेटणाऱ्यांमध्ये समावेश होता. भुजबळ यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भुजबळ समर्थकांना जोडण्यात येत आहे. तसेच "अन्याय पे चर्चा' हे अभियान राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. भुजबळ यांना सूडबुद्धीने डांबून ठेवण्यात आले आहे, असे त्यांच्या समर्थकांनी राज यांना सांगितले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आदी उपस्थित होते.
Web Title: nashik news raj thackeray meeting politics chhagan bhujbal