शहरातील गावठाणांना विकासनिधी देणारच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नाशिक - शहराला लागून असलेली खेडी महापालिकेत समाविष्ट असूनही विकासापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे त्या गावांच्या विकासासाठी महापौर रंजना भानसी यांनी यंदाच्या अंदाजपत्रकात दहा कोटींचा विकासनिधी देण्याची घोषणा केली. त्यानुसार आपण खेड्यांसाठी निधीची देणारच, असा विश्‍वास महापौरांनी व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यापासून नगरसेवकांना जाहीर केल्याप्रमाणे पाऊण कोटीच्या निधीतून विकासकामे सुरू झाल्याने त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी घोषणा केली.

महापालिका क्षेत्राची हद्द निश्‍चित होत असताना एकवीस खेड्यांचा त्यात समावेश करण्यात आला. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट येऊन पंचवीस वर्षे लोटली, तरी शहरात समाविष्ट झालेली ती खेडी विकासापासून कोसो दूर आहेत. मखमलाबाद, म्हसरूळ, वडनेर दुमाला, कामटवाडे, अंबड, पाथर्डी, वडाळा, आडगाव, चुंचाळे, पिंपळगाव खांब, दाढेगाव, टाकळी, नांदूर-मानूर, दसक, पंचक, चेहेडी, चाडेगाव, विहितगाव, मोरवाडी, गंगापूर, आनंदवली आदी गावांत अजूनही पाणीपुरवठ्याच्या सोयी नाहीत. व्यायामशाळा असल्या, तरी त्यांचे फक्त सांगाडे उरले आहेत. ड्रेनेजची व्यवस्था होणे बाकी आहे. मळे विभागात पथदीप नसल्याने सायंकाळनंतर गावे अंधारात बुडतात. या पार्श्‍वभूमीवर खेड्यांचा विकास करण्यासाठी महापौर भानसी यांनी २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात खेड्यांसाठी दहा कोटींचा विकासनिधी देण्याची घोषणा केली. नगरसेवकांना विकासकामांसाठीदेखील सढळ हाताने विकासनिधी दिला होता; परंतु पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे कारण देत आयुक्तांनी त्यास कात्री लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनसेच्या सत्ताकाळातील कामे रद्द करावी लागली. आयुक्तांनी नगरसेवकांना पाऊण कोटीचा निधी दिल्यानंतर याच धर्तीवर खेडी विकासासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध करून देणारच, असे महापौरांनी सांगितले.