त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात भातलावणीला वेग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

डीजीपीनगर  - या वर्षी मॉन्सूनचे आगमन हंगामाच्या वेळेनुसार झाल्याने त्र्यंबकेश्‍वर तालुका व परिसरात प्रमुख पीक असलेल्या भाताची दमदार रोपे तयार झाल्याने भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. 

डीजीपीनगर  - या वर्षी मॉन्सूनचे आगमन हंगामाच्या वेळेनुसार झाल्याने त्र्यंबकेश्‍वर तालुका व परिसरात प्रमुख पीक असलेल्या भाताची दमदार रोपे तयार झाल्याने भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेल्या इगतपुरीपासून हरसूल, गुजरात सीमेपर्यंत पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकाची आदिवासी बांधव मार्च-एप्रिलचे ऊन तापू लागल्यापासून तयारीला सुरवात करतात. यात जंगलातील पालापाचोळा, विविध झाडांच्या वाळलेल्या फांद्या यावर मातीचा थर देऊन ज्या ठिकाणी भात, नागलीच्या रोपासाठी बियाणे पेरणी करणार तेवढ्या भूभागाची भाजणी साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात केली जाते.

दमदार पावसाचे आगमन झाल्यानंतर बियाण्यांची पेरणी केली जाते. पंधरा ते वीस दिवस चांगला पाऊस झाल्यास जोमदार रोपे तयार होतात.

हा योग यंदा पावसाच्या चांगल्या आगमनाने जुळल्याने आदिवासी शेतकरी सुखावला आहे. असाच पाऊस नियमित सुरू असल्यास निश्‍चित भाताचे पीक चांगले येईल, अशी आशाही वाटू लागली आहे.