पगारच होत नसल्याने कामगारांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

रानवड सहकारी साखर कारखान्याचे कामगार गेली आनेक महिण्यांपासुन कारखान्यावर कामावर येत आहेत आधिच्या हरीभाऊ बागडेच्या कारखान्याकडे ऐकवीस तर अता मोठा गाजावाज्या करुन गळीत हंगाम सुरु करणार्या लथ वाबळे जोडीकडे तीन महिण्याचा पगार येणे असल्याने पगार मिळत नाही म्हणुन कामगारांना आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावा लागत असल्यामुळे शासनाने दखल घ्यायला हवी.
- बळवंत जाधव, कामगार युनियन अध्यक्ष

निफाड : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्या ताब्यातील रानवड साखर कारखान्यात पगार मिळत नसल्यामुळे उद्वीग्न झालेल्या तीन कामगारांनी आज रासाका कामगार बैठकीत बैठकीतच अंगावर रॉकेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने ऐकच खळबळ उडाल्याची घटना रानवड सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर घडली आहे

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की निफाड तालुक्यातील रानवड येथील कर्मविर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दोनशे ते अडीशे कामगार कामावर हजर होते. नेहमीप्रमाणे अाढावा बैठक सुरु झाली असतानाच अनाहुत पणे बैठकीत नाट्यमय घडामोड होऊन बबन काळे, मधुकर आहेर, बाळासाहेब ताकाटे या तिघांनी पगार होत नसल्याने हाताश होत कामगारानी कारखाना कामासाठी आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण रासाका कामगार युनियनचे अध्यक्ष बळवंत जाधव, उपाध्यक्ष नेताजी वाघ, पदाधिकारी शिवाजी डुबंरे, उत्तम रायते, अशोक कुशारे, आर आर वाघ, देवराम वाढवणे व समस्त कामगारांनी धाव घेत त्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांना समजावून सांगितले हा टोकाचा निर्णय घेऊ नका.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दहशतीमुळे प्रसारमाध्यमेही दखल घेत नसल्याचे सागंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याच्या छञपती संभाजी साखर उद्योग साखर कारखाना औरंगाबाद याने आधीच एकविस महिन्याचा तर हरिभाऊ बागडेच्या वतीने चालू गळीत हंगामात उपकाराने रासाका चालवयला घेतलेल्य राॅणीटन लथ व भारत वाबळे यांनी तीन महिन्याचा पगार न देता असे दोन्ही साखर चालकाच्या माध्यमातून एकूण तेरा कोटी पन्नास लाख रूपये कामगारांचे थकविले आहे. दोन वषाॅपासून दिवाळी अंधारत घालवत आहो पण या नवीन आलेल्या लथ व वाबळे यांनी तर खोटी अश्वासने देऊन अहोरात्र परिश्रम करून घेतले व पैसे द्यायची वेळ आल्यावर पोबारा केला असून त्या बाबत पोलिसांत गेल्यावर आता देतो ऊद्या देतो आसे उत्तरे देत आहे. तर आम्हाला कामावर येतांना घरचे मुले बाळे दरोरोज विचारतात पगार झाला का काय सांगायचे. यंदाच्या दिवाळीच्या सणाला नाही केले काही. उपकराराने घेतलेल्या लथ आणि वाबळे यांच्याकडुन तरी पगार होतील अन गोडधोड आता करू पण सर्व व्यर्थ ठरल्याने आशेचा किरण संपला आहे. तसेच आता  सहनशक्ती संपली आम्ही आत्महत्या करतो मगच या शासनाला जाग येईल की दोन वर्षांपासून अंधारात वीज, पाणी व पगारा शिवाय हे लोक कसे जगताय हे जगाला कळू द्या आम्हाला मरू द्या असे अंगावर रॉकेल ओतुन घेणारे कामगार रडून सांगत असताना वातावरण आणि जमलेल्या रासाका कामगारांत वातावरण धिरगंभिर बनले होते.

रानवड सहकारी साखर कारखान्याचे कामगार गेली आनेक महिण्यांपासुन कारखान्यावर कामावर येत आहेत आधिच्या हरीभाऊ बागडेच्या कारखान्याकडे ऐकवीस तर अता मोठा गाजावाज्या करुन गळीत हंगाम सुरु करणार्या लथ वाबळे जोडीकडे तीन महिण्याचा पगार येणे असल्याने पगार मिळत नाही म्हणुन कामगारांना आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावा लागत असल्यामुळे शासनाने दखल घ्यायला हवी.
- बळवंत जाधव, कामगार युनियन अध्यक्ष

Web Title: Nashik news salary issue in Niphad