सप्तश्रृंगी मातेचा जयघोष अन् ढोल ताशांचा गजर

सप्तश्रृंगी मातेचा जयघोष अन् ढोल ताशांचा गजर
सप्तश्रृंगी मातेचा जयघोष अन् ढोल ताशांचा गजर

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, पायातील घुंगराची छमछम व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी (वणी) गडाकडील रस्ते निनादून गेले असून, सप्तश्रृंगी गडाकडे येणारे रस्ते कावडीधारकांचे भगवे कपडे व पदयात्रेकरुंच्या हातात असलेल्या देवीच्या झेंड्यांमुळे सपूर्ण परीसर भगवामय झाला आहे. आज (गुरुवार) कोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) उत्सव व कावड यात्रा वणी गडावर संपन्न होत असून, त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रना सज्ज झाली आहे.

महाराष्ट्रातीन साडेतीन शक्तीपीठां पैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तश्रृंगी (वणी) गडावर दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेस कावड यात्रा संपन्न होते. गडावर होणाऱ्या चैत्रोत्सव, नवरात्रोत्सवा प्रमाणेच कोजागिरी पौर्णिमा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. या दिवशी आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेस अभिषेक विधी करण्यासाठी हजारो कावडीधारक पूणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा आदी ठिकाणाहून तापीचे, ओंकारेश्वर, इंदुर येथून नर्मदेचे, उज्जेन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किमी अंतरावरुन अनवाणी प्रवास करून वणी गड व परीसरात दाखल होतात. तसेच नाशिक जिल्ह्यातीलही कावडीधारक व पदयात्रेकरु त्र्यंबकेश्वर व नाशिक (पचंवटी), कसमादे भागातील मोसम, गिरणा नदीचे जल (तीर्थ) घेवून गडावर येत असतात. दिवसेंदिवस कावड यात्रेत कावड घेवून येणारे भाविक तसेच पदयात्रेकरुंमद्ये वाढ होत असल्याने देशातील प्रमुख कावड यात्रांमध्ये वणी गडाचीही गणना होवू लागली आहे.

दरम्यान, कोजागिरीच्या पूर्वसंध्येस वणी गांव व सप्तश्रृंगी गड व परीसरात दाखल झाले असून, कावडीधारक व पदयात्रेकरुंच्या गर्दीने नाशिक-वणी, कळवण-नांदुरी रस्ता भगवामय झाला असून, रस्त्याला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वणी गावातील जगदंबा मातेचे दर्शन घेवून काही कावडीधारक सप्तश्रृंगी गडावर रवाना होत आहे तर वणी पाच हजारांवर कावडीधारक व पदयात्रेकरु मुक्कामी थांबले आहेत. येथील जगदंबा मंदीराचा सभागृह, सांस्कृतिक सभागृह येथे निवास व विश्रांतीची सोय करण्यात आलेली असून मिळेल त्या ठिकाणी कावडीधारक विश्रांती घेत होते. कावडीधारकांमध्ये महिलांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. नाशिक व कळवण बाजुकडून रस्ता कावडीधारकांच्या गर्दीने ओसंडून वाहात असल्याने मार्गावरील वाहाने संथ गतीने धावत होते. नाशिक वणी रस्त्यावर व वणी गावात ठिकठिकाणी स्वयंसेवी मंडळतर्फे कावडीधारक व पदयात्रेकरूंना फराळ, दुध, नाष्टा, सरबत व पिण्याच्या पाण्याची सुविधा व रात्री महाप्रसादाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती.

आज दुपारी 12 वा देवीची नैवदय आरती व सांयकाळी ७ वा. वाजता ‘शांतीपाठाने देवीच्या कोजागिरी उत्साहास प्रारंभ होईल. दुपारी २  वाजेपासून कावडीधारकांना व्हीआयपी गेटमधुन मंदीरात सोडण्यात येणार आहे. दुपारी २ ते रात्री १० पर्यंत  कावडीधरकांनी आणलेले पवित्र नदयांचे जल कावडीधारक स्वत: जलाभिषेकासाठी ठेवण्यात आलेल्या दहा ते पंधरा पिंपामध्ये ओतील व त्यानंतर ११ पुरोहित लाखो भाविकांच्या उपस्थीत सप्तश्रृंगीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

कोजागीरी उत्साहाचे भाविकांचे खास आकर्षन असलेल्या किन्नरांची दिक्षा कार्यक्रमा बरोबरच शेकडो किन्नरांच्या उपस्थितल असणारी छबिना मिरवणूक निघणार अाहे. त्यादृष्टीन किन्नरांचे वेगवेगळे गट गडावर दाखल झाले असून सकाऴ पर्यंत दाखल होत आहे. कावडीधारक व यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, निवास व इतर कार्यक्रमांसाठी न्यासााची तयारी पूर्ण झाली असून भाविकांना प्रसादालयात सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोजागिरीच्या पूर्वसंध्येस गडावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून नांदुरी सप्तश्रृंगी रस्ता खाजगी वाहानांसाठी बंद करण्यात येणार असल्याने कावडीधारकांची साहित्य असलले हजारो वाहाने तत्पूर्वीत गडावर दाखल झाल्याने गडावर वाहानांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान आज मध्यरात्री पासून नांदुरी - सप्तश्रृंगी गड या दरम्यान फक्त राज्य परीवहन महामंडाच्या बसेस वाहतूक करणार असल्याने  ५० बसेस भाविकांच्या वाहतूकीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यानचीच आरोग्य, पाणीपूरवठा, स्वच्छता, पोलिस यंत्रणा कायम ठेवण्यात आल्या असून आज रात्री पासूनच सर्व यंत्रणा कार्यान्वीत होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com