शिवसेनेची भाजपवर खड्डेप्रश्‍नी कुरघोडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

राज्यात पहिला प्रयोग
राज्यात नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हा पहिला प्रयोग आहे. प्रायोगिक तत्त्वावर नायगाव गटासाठी सर्वेक्षण करण्यात आले. दोन दिवसांमध्ये 93 किलोमीटरचे सर्वेक्षण झाले आहे. हाच उपक्रम मतदारसंघासाठी राबवण्यात येईल. "नाशिक लोकसभा' नावाचे ऍप्लिकेशन तयार करण्यात येईल. कॅमेऱ्यातून रस्त्यांची स्थिती चित्रीत होते, असेही गोडसे यांनी सांगितले.

नाशिक : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्‍नी शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर कुरघोडी केली. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी इस्त्रोच्या माध्यमातून मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. लोकसभा मतदारसंघातील हे सर्वेक्षण चार महिन्यांत पूर्ण होईल. सर्वेक्षणाचा फायदा सरकारला होईल. रस्त्यांचे काम नेमके किती करायचे, किती खड्डे बुजवायचे याची माहिती उपलब्ध होईल, असे गोडसे यांनी म्हटले आहे.

गोडसे म्हणाले, की रस्त्यांवरील खड्डे ग्रामीण आणि शहरी भागाला त्रासदायक ठरत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांची स्वतंत्र यंत्रणा खड्ड्यांचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करते. मात्र, रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता भासते. अशावेळी सर्वाधिक खड्डे असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य मिळणे आवश्‍यक आहे. मात्र, हे काम कागदावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खड्ड्यांबद्दलची अचूक माहिती मिळत नाही. ही उणीव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दूर करता येणार आहे.