नाशिकहून  मुंबईकडे बस रवाना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाशिक - मुंबईत झालेल्या मुसळधारेमुळे नाशिक- मुंबई मार्गावरील वाहतूक आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत पूर्ववत झाली. त्यामुळे सायंकाळी कल्याणहून नाशिकला बसगाडी दाखल आल्यानंतर या मार्गावर बस सुरू करण्यात आल्या. तत्पूर्वी सायंकाळपर्यंतच्या मुंबईसाठी सर्व बसफेऱ्या रद्द केल्या होत्या. 

दुरंतो एक्‍स्प्रेसचे डबे घसरल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली. त्यातच मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने मुंबईहून येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन्ही प्रवाशांचे अतोनात हाल झाले. काल सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या सर्व बसगाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. आज दिवसभर मुंबईकडे बसगाड्या सोडल्या नाहीत. सुमारे पंचवीसहून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. शहरातून मुंबईला जाणाऱ्या बहुतांश गाड्या नाशिकला थांबत होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कल्याणसाठी आजच्या दिवसाची पहिली गाडी रवाना झाली. 

मनमाडला जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी 
कसाऱ्याहून एसटीने नाशिक गाठलेल्या प्रवाशांनी मनमाडहून पुढील मार्गासाठी रेल्वेगाडीचा पर्याय पसंत केला. त्यामुळे नाशिकहून मनमाडला जाणाऱ्या बसगाड्यांमध्येमही महामार्ग बसस्थानक येथे गर्दी झाली होती. 

खासगी ट्रॅव्हल्स, ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांकडून विश्रांती 
मुंबईला जाणारा रस्ता बंद केल्याने आज बहुतांश ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी बस उभ्याच ठेवल्या. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनीही जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य मालाची वाहतूक केली नाही. त्यामुळे मुंबईहून स्थानिक बाजारपेठेत दाखल होणारा माल आज पोहोचू शकला नाही.