नाशिकमध्ये एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

चौधरी यात्रा कंपनीतर्फे प्रवाश्‍यांसाठी गाड्या उपलब्ध 
परीस्थितीचे गांभीर्य ओळखत चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. चे संचालक ब्रीजमोहन चौधरी यांनी ठक्‍कर बाजार बसस्थानकाला भेट दिली. तसेच धुळे, मालेगाव, पुणे यासह विविध मार्गांसाठी एसटी बसगाडीच्या भाड्यापेक्षाही कमी पैसे आकारत सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे संपात भरडत असलेल्या प्रवाश्‍यांना काहीसा दिलसा मिळाला.

नाशिक : एसटी कामगार संघटना कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी रात्री बारापासून बस स्थानके, आगार परीसरात ठाण मांडत निदर्शने केली. दरम्यान आंदोलनामुळे दुपारपर्यंत तीन हजारहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे दुपारी बारापर्यंत वीस हजारहून अधिक प्रवाश्‍यांचे हाल झाले. दरम्यान आंदोलनाची संधी साधत खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायिकांकडून पुण्यासाठी दोन हजार तर धुळ्यासाठी तब्बल तीनशे रूपये भाडे आकारले जात होते.

आंदोलनाच्या पार्श्‍वभुमिवर राज्य परीवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय एन. डी. पटेल मार्ग येथे तसेच ठक्‍कर बाझार बसस्थानक, महामार्ग बसस्थानक येथे मध्यरात्रीपासूनच तप्त वातावरण होते. सकाळी आगारातून बसही बस बाहेर पडू दिली नाही. तर चांदवड टोलनाका व अन्य काही ठिकाणी बसगाडी उभी असतांना गाडीची हवा सोडत आंदोलनकर्त्यांनी बससेवा बंद पाडली. जिल्हा प्रशासनातर्फे बस स्थानक परीसरात पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला होता. विशेष पथकासह पोलिसांचा फौजफाटा तैणात केला होता. 

आंदोलनात सहभागी वाहक व चालकांनीही स्थानक परीसरात उपस्थित राहून परीस्थितीवर लक्ष ठेवले. या दरम्यान प्रादेशिक परीवहन अधिकारी भरत कळसकर यांनी खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसगाड्या स्थानकात आणण्याचे आवाहन केले असता, त्यास चालक-वाहकांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी स्थानक परीसरात वाहने उभी करत प्रवाश्‍यांची वाहतुक केली. काही खासगी वाहतुकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारत प्रवासी वाहतुक केली. 