पोलिसावर हल्ला करणाऱ्या संशयिताची काढली वरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

जुने नाशिक - पोलिस कर्मचारी बाळू खरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताची भद्रकाली पोलिसांनी आज वरात काढली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत आज पुन्हा वाढ केली.

जुने नाशिक - पोलिस कर्मचारी बाळू खरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयिताची भद्रकाली पोलिसांनी आज वरात काढली. न्यायालयाने त्याच्या कोठडीत आज पुन्हा वाढ केली.

दूध बाजार पोलिस चौकीत नियुक्तीस असलेले बाळू खरे परिसरात पायी गस्त घालत असताना रायगड येथील रमेश जाधव या संशयिताने पोलिसांविरुद्धच्या रागाच्या भरात खरे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. सोशल मीडियावर हल्ल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर चार दिवसांनी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यास शनिवारी (ता. १५) तलावाडी भागातून अटक केली होती. रविवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडीत एक दिवसाची वाढ केली. पोलिस कोठडी दिल्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळासह भद्रकाली फुले मार्केट, दूध बाजारसह अन्य भागातून त्याची पायी वरात काढली.