महापालिका कर विभागाचे उपायुक्त दोरकुळकरांनाही स्वाइन फ्लूची बाधा?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नाशिक - शहरात स्वाइन फ्लू आजार नियंत्रणात असल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य विभाग व वैद्यकीय विभागाला आज आणखी एक दणका बसला. महापालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनाच स्वाइन फ्लूसदृश आजार झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

शहरात चारशेहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, त्यामुळे मृतांची संख्या साठपर्यंत पोचली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत शहरात डेंगी व स्वाइन फ्लूचा आजार नियंत्रणात असल्याचा दावा आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून सातत्याने केला जात आहे. पण हा दावा फोल ठरत आहे.

आतापर्यंत शहरात चारशेहून अधिक रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. स्वाइन फ्लूने मृतांचा आकडा साठपर्यंत पोचला आहे. या महिन्यात १३ दिवसांत स्वाइन फ्लूचे नवीन ११ रुग्ण आढळले. त्यांपैकी तिघे मृत झाले. शहराबाहेरील रुग्णांची संख्या वीसवर पोचली असून, त्यांपैकी सहा रुग्ण मृत झाले आहेत.

महापालिकेचे विविध कर विभागाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनासुद्धा स्वाइन फ्लू झाला आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी स्वाइन फ्लूसदृश आजार असल्याचे सांगितले. स्वॅप तपासणीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे उपायुक्त दोरकुळकर यांनी सांगितले. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दोरकुळकर यांना स्वाइन फ्लू झाला नसल्याचे सांगितले.