दरड पडल्यानंतर बंद असलेले सप्तश्रृंगी देवीचे मंदिर खुले

दिगंबर पाटोळे
रविवार, 25 जून 2017

वणी - सप्तश्रृंगी गडावर दरड पडण्याच्या घटनेनंतर सुरक्षिततेतच्या कारणास्तव बंद ठेवलेले मंदिर आज (रविवार) भाविकांसाठी खुले करण्यात आले. ऊन, पाऊस व धुक्‍याची अनुभूती घेत आज सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

वणी - सप्तश्रृंगी गडावर दरड पडण्याच्या घटनेनंतर सुरक्षिततेतच्या कारणास्तव बंद ठेवलेले मंदिर आज (रविवार) भाविकांसाठी खुले करण्यात आले. ऊन, पाऊस व धुक्‍याची अनुभूती घेत आज सुमारे पंचवीस हजारांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सप्तश्रृंगी गडावर बारा जून रोजी भगवती मंदिर परीसरात दरड कोसळली होती. त्यानंतर दरड काढण्याच्या कामासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम विभागाने 21 जून ते 27 जून असे सात दिवस मंदिर बंद ठेवले होते. मात्र रॉकफॉल बॅरिअरवर पडलेले दरड काढणाऱ्या रेस्क्‍यु टीमने युध्दपातळीवर काम करुन तीन दिवसांतच दरड सुरक्षितरीत्या खाली उतरविल्याने आज सकाळी साडेपाच वाजल्यापासून मंदिर भाविकांना पूर्ववत दर्शनासाठी खुले करण्यात आले. दरम्यान शनिवारी दिवसभर गडावर सुरु असलेल्या रिमझिम पावसानंतर आज सप्तश्रृंगी गडावरील निसर्ग सौंदर्य खुलले होते. त्यातच सलग तीन दिवस असलेल्या सुट्ट्यांची पर्वणी साधत आज सकाळपासून भाविकांबरोबरच पर्यटकांनीही सप्तश्रृंगी गडावर गर्दी केली होती. अधूनमधून पडणारी सूर्याची किरणे, धुके व डोंगर शिखरावरुन पडणारे पाण्याचे फवारे यांचा सुखद अनुभव घेत व भगवतीच्या जयघोषत भाविक भगवतीचरणी नतमस्तक झाले. दरम्यान मंदिरातील दैनंदिन पूजाविधी, आरती, महाअभिषेक पूजा नित्यनियमाने सुरु झाल्या असून दरड पडल्यानंतर मंदिरातून बंद करण्यात आलेला परतीच्या पायऱ्यांचा मार्गही खुला करण्यात आला आहे. अनेक भाविकांना मंदिर सुरु झाल्याची माहिती झाली नसल्याने आज भाविकांची अपेक्षित गर्दी नसली तरी सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान दरड काढण्याचे काम करणाऱ्या मॅकाफेरी कंपनीच्या टिमने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कंकरेचा, सहाय्यक अभियंता केदार यांचे मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम करुन मुदतीपुर्वी तीन दिवस अगोदरच मंदिर भाविकांसाठी खुले केल्याबद्दल भाविक, ग्रामस्थ व व्यवसायीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर...

01.39 AM

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017