मनमाडच्या शुभमने पटकावले सुवर्णपदक

कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकावले
कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकावलेesakal

मनमाड (नाशिक) : कजाकिस्थान येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात येथील सावरकर नगर जिमखान्याचा कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकावत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. शुभमच्या या ऐतिहासिक कामगिरीने मनमाडचे नाव जागतिक पातळीवर चमकले आहे. या विजयाबद्दल शुभमचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकावले
राजापूरच्या सुकन्येची सुवर्णपदकाला गवसणी

कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा योग मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू कुस्तीपटू शुभम हरी अचपळे याला आला. शुभमने ४८ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घालत कजाकिस्थानमध्ये या एशियन चॅम्पीयन कुस्ती स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. शुभमला प्रशिक्षक, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

शुभम चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकरी कुटूंबातील मुलगा आहे. सतत सराव, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर यश मिळवल्याचा मनोदय गिडगे यांनी व्यक्त केला आहे. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल असतांनाही वडील हरिभाऊ अचपळे व आई मंदाकिनी यांनी शुभमला घरातून कुस्तीसाठी प्रोत्साहीत केले. शुभमचे गुरुवर्य साईनाथ गिडगे यांनी शुभमला व त्याच्या लहान भावाला वयाच्या ६ व्या वर्षी दत्तक घेतले. त्यानंतर शुभमने साईनाथ गिडगे यांच्या तालमीत कुस्तीचे धडे गिरविले.

कुस्तीवीर शुभम आचपळे याने सुवर्णपदक पटकावले
स्मृतीसाठी जीव झाला यडा पिसा, पेट्रोल नाही तरी आला भेटायला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com