नाशिक महापालिका निवडणुक | नगरसेवकांना अर्धा कोटींचा निधी

प्रशासनाच्या अंदाजपत्रकात स्थायीकडून ३४० कोटींची वाढ

Nashik Municipal Corporation Election Fund
Nashik Municipal Corporation Election Fund sakal

नाशिक : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी स्थायी समितीला सादर करण्यात आलेल्या दोन हजार २२७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ३३९, ९७ कोटींची वाढ करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात विकासकामांसाठी २७२ कोटी रुपयांची तरतूद करताना नगरसेवकांच्या प्रभाग विकासनिधी पन्नास लाखांपर्यंत पोचविण्यात आला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करण्यात आले. उत्पन्नाच्या बाजूचा विचार करून दोन हजार २२७ कोटींचे प्रारूप अंदाजपत्रक सादर करण्यात आले. प्रशासनाच्या अंदाजपत्रकात नवीन विकासकामांसाठी ८५. ९८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे स्थायी समितीने नगरसेवकांची पडती बाजू लक्षात घेऊन ३३९. ०७ कोटी रुपयांच्या कामांची अतिरिक्त भर घातली आहे. ३३९. ९७ लाखांच्या वाढीमुळे अंदाजपत्रक आता २५६७ कोटींपर्यंत पोचले आहे.

प्रशासनाने १३३ नगरसेवकांसाठी प्रत्येकी तीस लाख रुपये प्रमाणे ४१. ४० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात स्थायी समितीने वीस लाख रुपयांची वाढ करताना नगरसेवकांसाठी प्रभाग विकासनिधी पन्नास लाखांपर्यंत पोचविण्यात आला असून, एकूण ६९ कोटी रुपयांची तरतूद आहे. तीन नगरसेवकांच्या एका प्रभागासाठी दीड कोटी रुपयांचा प्रभाग विकासनिधी उपलब्ध होईल. खर्चाप्रमाणेच उत्पन्न वाढीच्या बाजूंमध्ये ३४० कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली. प्रशासनाने भूखंड बीओटीवर विकसित झाल्यास दोनशे कोटी रुपयांचे उत्पन्न ग्राह्य धरले. त्यात स्थायी समितीने १८७ कोटी रुपयांची वाढ करताना ‘बीओटी’ मधून ३८७ कोटी रुपये उत्पन्न ग्राह्य धरले. नगररचना विभागाकडून प्राप्त होणाऱ्या विकास शुल्कात ६३ कोटी, अतिरिक्त एफएसआय विक्रीतून ४२. ५१ कोटी रुपये, अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी ३८. ७६ कोटी रुपये प्राप्त होतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com