नाशिक : अखेर सामाजिक कार्यकर्त्यानेच भागवली तहान

मनपा अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही पाण्याची समस्या सुटली नाही
Nashik water issues social worker Supply water tanker at own cost
Nashik water issues social worker Supply water tanker at own cost sakal

म्हसरुळ : मनपा अधिकाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या, नागरिकांनी मोर्चा नेला, अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली. परंतु पाण्याची समस्या काही सुटली नाही. अखेर एका सामाजिक कार्यकर्त्यानेच पुढाकार घेतला आणि स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविली.

म्हसरुळ परिसरातील ओंकारनगर, वृंदावन नगर, बोरगड, गणेशनगर आदी भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांनी अनेकदा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडे तक्रारी केल्या. महापालिकेवर धडक मोर्चाही नेला. अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले, मात्र अद्याप हा प्रश्न सुटला नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ओंकारनगर परिसरात येणाऱ्या पहाटे पाण्याच्या वेळी येऊन येथील पाण्याच्या पुरवठ्याच्या समस्येविषयी जाणून घेतले होते. येथील प्रश्नाचे बारकाईने सर्वेक्षण केले. मात्र, त्यावर उपाययोजना झाली नसल्याने हा प्रश्न ''जैसे थे ’ राहिला.

त्यामुळे या परिसरातील अघोषित पाणीकपात सुरू राहिली. अखेर ही बाब या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वखर्चाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी दर्शवीत शुक्रवार पासून ही जलसेवा सुरू केली. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करून तहान भागविल्याबद्दल जाधव यांचे आभार मानले आहे.

महापालिका हद्दीतील शहराच्या मध्यवस्तीतील रहिवासी भागात पाण्यासारखा मूलभूत प्रश्न अजूनही सुटला नसल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ही समस्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना परिसरातील गरजवंतांना मोफत टँकर सुविधा सुरू केली. या सुविधेच्या माध्यमातून येथील रहिवाशांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे.

- प्रवीण जाधव, सामाजिक कार्यकर्ते, म्हसरूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com