नाशिक परिसरात तीन जणांचा बुडून मृत्यू

गंगापूर येथील धबधब्यात दोन तरुणांचा; मनपा कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
Three drowns in Nashik area
Three drowns in Nashik areaSakal

नाशिक - नाशिक परिसरात मंगळवारी व बुधवारी दोन वेगवेगळ्या घटनात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.

गंगापूर येथील धबधब्यात दोन तरुण बुडाले

गंगापूर गावालगत असलेला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी दोन जण नदीपात्रात बुडल्याची घटना मंगळवारी (ता.१९) दुपारी एकला घडली. घटनेनंतर पोलिस व अग्निशमन विभागाकडून या दोघा तरुणांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत गंगापूर धरणातून ६०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे सोमेश्‍वर व गंगापूर गावातील दूधसागर धबधबा पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले आहे. देवळाली कॅम्प येथील चार मित्र मंगळवारी दुपारी एकला गंगापूर येथील दूधसागर धबधबा बघण्यासाठी आले होते. यावेळी चौघांमधील आकाश पाचोरी (वय २२) हा तरुण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरला.मात्र थोड्याच वेळेत त्याला पाहण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मित्र बुडत असल्याचे दिसताच महेंद्र मेहेर (वय २२) हा त्याला वाचविण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरला. मात्र तोही बुडू लागला. दोन तरुण बुडत असल्याचे कळताच येथील लोकांनी आरडा ओरड करण्यास सुरवात केली. घटनेबाबत तत्काळ पोलिसांसह अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन विभागाचे दोन पथक हे तत्काळ घटनास्थळी पोहचत त्यांना या मुलांना शोधण्याचे काम होती घेतले. यावेळी गंगापूर गावातील स्थानिकांची देखील मदत घेण्यात आली.

मनपा कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

म्हसरूळ - रामकुंडातील गांधी तलावात बुडून १६ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आणखी एकाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. १८) बुडालेल्या या तरुणाचा रामकुंडावरील जीवरक्षकांनी मंगळवारी दुपारी शोध घेतला. मयत व्यक्ती मनपाचा कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खंडेराव मंदिर परिसरातील गोदापात्रात सोमवारी (ता. १८) रात्री एक तरुण बुडाला. या वेळी नदीपात्रात बराच शोध घेऊनही हा तरुण काही सापडला नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळपासून अग्निशमन दलाचे जवान आणि जीवरक्षक दलाच्या तरुणांकडून शोधकार्य सुरू होते. अथक प्रयत्नानंतर अखेर सायंकाळी टाळकुटेश्वर मंदिर परिसरातील गोदापात्रात या तरुणाचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षकांना यश आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राकेश विनायक नेहरे (२७, रा. क्रांतीनगर, पंचवटी), असे या मृत तरुणाचे नाव असून, तो मनपाचा कंत्राटी कर्मचारी होता. मनपाच्या पंचवटी मलेरिया विभागात तो औषध फवारणीचे काम करत होता. वर्षभरापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, त्यांच्या जागेवरच राकेश कामाला लागला होता. दरम्यान, यावेळी रामकुंडावरील आदिवासी जीवरक्षक दलाचे विश्वनाथ कवटे, सुरेश वाघमारे, दीपक जगताप, सुनील बोरसे, दीपक माळी, दत्ता कवटे, कान्हा खांदवे, शंकर माळी, उदय संघमफे, उदय वाघमारे, रोहित वाघमारे, यशवंत जाधव, प्रदीप सहाणे, अजय पाटील, बाप्पा सोळंके, लखन पवार आदी तरुण बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात पोहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com