सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या सभापतिपदी निलेश पाकळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

सटाणा : येथील सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या सभापतीपदी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पाकळे तर उपसभापतीपदी भाजपचे शहराध्यक्ष राहुल भिका सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.पी.अहिरे यांनी काम पाहिले.

सटाणा ग्राहक सहकारी संघाच्या मावळत्या सभापती मंगला सोनवणे तर उपसभापती राजेंद्र सरदार यांनी आवर्तनानुसार आपापले राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त पदांसाठी आज येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात संचालक मंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सभापतीपदासाठी निलेश पाकळे तर उपसभापतीपदासाठी राहुल सोनवणे यांचे एकेकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अहिरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. बिनविरोध निवडीचे वृत्त सभागृहाबाहेर येताच समर्थक व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला.

यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी नुतून सभापती पाकळे व उपसभापती सोनवणे यांची शहरातून ढोलताशांच्या गजरात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी मावळत्या सभापती मंगला सोनवणे, माजी सभापती व संचालक अरविंद सोनवणे, अरुण सोनवणे, नंदू सोनवणे, जिभाऊ सोनवणे, अरुण सोनवणे, प्रवीण बागड, राजेंद्र सरदार, सौ.किरण सोनवणे, राहुल सोनवणे, योगेश अमृतकार, यांच्यासह बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, डॉ.शेषराव पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, साहेबराव सोनवणे, बिंदू शर्मा, माजी नगरसेवक छोटू सोनवणे, बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संजय देवरे, जीवन सोनवणे, डॉ.आशिष सूर्यवंशी, नगरसेवक मुन्ना शेख, दीपक पाकळे, शरद शेवाळे, दिलीप दळवी, डॉ.विशाल सूर्यवंशी, परशुराम पाकळे, मधुकर नंदाळे, महेश वाघ, रवींद्र सोनवणे, प्रभाकर नंदाळे, राजेंद्र देवरे, अमोल पवार, जीवन गोसावी, सौरभ सोनवणे, शिवाजी सोनवणे आदी उपस्थित होते.

सटाणा ग्राहक सहकारी संघाला जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एक लौकिक प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सभासद हितासाठी लवकरच विविध योजना राबवणार असून संस्थेचे आर्थिक स्रोत वाढविण्यावर भर देणार आहे. याकामी सर्व संचालक व सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.
- निलेश पाकळे, नवनिर्वाचित सभापती, सटाणा ग्राहक सहकारी संघ

Web Title: Nilesh Pakale elected as chairman of Satana consumer cooperative society