निफाडचा पारा 5.4; नाशिक 6.5 अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017
नाशिक : राज्यात सध्या थंडीची लाट कायम असून, राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे मंगळवारी 5.4 अंश सेल्सियस इतकी नोंदली गेली; तर नाशिकचाही पारा 6.5 अंश सेल्सियसपर्यंत घसरला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.

उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्‍याची थंडी आहे; तर काश्‍मीर, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बर्षवृष्टी सुरू असल्याने देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभरापासून किमान तापमानामध्ये कमालीची घट झाली आहे. आजही पुन्हा राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे 5.4 अंश सेल्सियस इतकी झाली. शनिवारी (ता.7) देखील निफाड येथे 5 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते. मालेगावच्या किमान तापमानातही घट झाली असून, आज 8.4 अंश सेल्सियस; तर जळगाव येथे 9.6 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - वीजविषयक माहिती ग्राहकांच्या मोबाईलवर "एसएमएस'ने पाठविण्याची सुविधा...

05.57 AM

नाशिक - आसाममधील महापुरामुळे उत्तर पूर्व मार्गावरील रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळित...

05.51 AM

नाशिक - विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात प्रगत (टर्शरी) कर्करोग केअर कक्ष सुरू...

04.27 AM