बागलाण, मालेगाव तालुक्‍यांसाठी साडेतीन कोटींचा निधी - डॉ. भामरे

बागलाण, मालेगाव तालुक्‍यांसाठी साडेतीन कोटींचा निधी - डॉ. भामरे

सटाणा - बागलाण व मालेगाव तालुक्‍यांतील विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून ३.५० कोटी रुपयांच्या निधीस अंतिम मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली.

डॉ. भामरे यांनी सांगितले, की २०१४ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांचा अनुशेष भरून काढत कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून मतदारसंघासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यश मिळाले आहे. बागलाण व मालेगाव तालुक्‍यांतील जलसिंचन, रस्ते व इतर विकासकामे मार्गी लागत असताना जिल्हा नियोजन मंडळातून देखील अधिकाधिक निधी उपलब्ध करून या दोन्ही तालुक्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर वाढलेल्या राजकीय वजनाचा फायदा मतदारसंघासाठी करून घेत असून, केंद्र व राज्य शासनाकडून बागलाण व मालेगाव या दोन्ही तालुक्‍यांसाठी अतिरिक्त निधी वळवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य शासनाकडून या दोन्ही तालुक्‍यांतील गावांच्या विकासकामांसाठी ३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बागलाण तालुक्‍यातील ठेंगोडा, मोरेनगर, ब्राह्मणगाव, गोळवाड, अंबासन, सारदे, लखमापूर, राहूड (चिराई), नवी शेमळी, करंजाड, निकवेल, कौतिकपाडा, विंचूर, खामलोन, काकडगाव, दरेगाव, दऱ्हाने, मुल्हेर, नवे निरपूर, नामपूर, मळगाव भामेर, चौंधाणे, वायगाव, नळकस, तर मालेगाव तालुक्‍यातील सायने, शेंदुर्णी, बेळगाव, मानके, रावळगाव, देवारपाडे. झोडगे, दाभाडी, साजवहाळे, पांढरूण, नांदगाव, टिंगरी, विराणे, दुंधे, टेहरे, टिपे (खालचे), पाटणे, सौंदाणे या गावांचा यामध्ये समावेश असल्याचेही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com