उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 8 एप्रिलला दीक्षान्त समारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षान्त समारंभ 8 एप्रिलला होणार आहे. समारंभास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विविध विद्या शाखांतील 75 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या कार्यकाळातील हा पहिलाच दीक्षान्त समारंभ आहे. समारंभाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठात विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.