ओडवडार समाजालाही संवैधानिक दर्जा द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

म्हसदी (जि. धुळे) - देशातील दहा राज्यांत वडार, बेलदार भटक्‍या जमातीला संवैधानिक दर्जा देण्यात आला आहे. तोच दर्जा राज्यातील ओड (वडार) समाजाला द्यावा, असा ठराव पुणे येथे झालेल्या ओड (वडार) कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यात आला.

या बैठकीस वडार समाजाचे राज्यातील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतर राज्यात आरक्षण मिळते मग महाराष्ट्रातच का नाही? असा प्रश्‍न उपस्थित करून त्यासाठी आता राज्य आणि देशपातळीवर पाठपुरावा करण्याचे निश्‍चित करण्यात आले. दगड फोडणे, दगड घडविणे, मातीकामासंबंधीची सर्व कामे करणे हे व्यवसाय करणारे ओड, वडार, वड्डे, वड्डेलु, वड्डर, भोवी, बेलदार, बोयर, ओड राजपूत, बंडीवड्डर, सिरिकीबंद या नावाने ओळख असलेला समाज महाराष्ट्रात वडार म्हणून ओळखला जातो. उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल येथील बेलदार, कर्नाटक येथे भोवी, तमिळनाडूत बंडीवड्डर या नावाने असलेल्या वडार समाजाला तेथे अनुसूचित जातीचा संवैधानिक दर्जा दिलेला आहे.

या विषयावर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव गुंजाळ, सरचिटणीस भरत यांनी राज्यात दोन्ही समाज एकत्र करत राज्य सरकारसमोर प्रखर भूमिका मांडत आरक्षणाची शिफारस राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे नेण्यात येईल, असे जाहीर केले.