संपत्तीच्या वादातून जिवंत जाळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

साक्री- कौटुंबिक संपत्तीच्या वादातून जैताणे (ता. साक्री) येथील गोकुळ माळी यांना त्यांच्या मोटारीत बांधून जिवंत जाळण्यात आले. शनिवारी रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास घडलेल्या व क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी संशयित म्हणून चुलतभाऊ-पुतण्यासह चौघांना अटक केली असून, एक जण फरार झाला. गोकुळ माळी पाटबंधारे विभागात वाहनचालक व समता परिषदेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

गोकुळ माळी यांचे चुलतभाऊ कृष्णा गजमल माळी (रा. नंदुरबार) व त्यांची मुले प्रल्हाद कृष्णा माळी, विजय कृष्णा माळी, चुलतभाऊ काशिराम गजमल माळी, त्यांचा मुलगा तुकाराम काशिराम माळी यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. त्यांनीच वडिलांना जिवंत जाळले, असे गोकुळ माळी यांचा मुलगा धनंजय माळी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ माळी हे काल अंत्यविधीसाठी चाळीसगावला गेले होते. जाताना ते सॅंट्रो मोटार पाटबंधारे विभागात लावून गेले होते. रात्री सुमारे दहाच्या सुमारास ते मोटार घेण्यासाठी आले असावेत. त्यानंतरच त्यांना जाळण्यात आल्याचा संशय आहे. संशयितांनी मोटार पेटविल्यानंतर ती सरळ महामार्गाच्या दिशेने लोटल्याचे बोलले जात आहे. ही मोटार रस्ता ओलांडून तहसील कार्यालयाजवळील कडुनिंबाच्या झाडाला धडकली होती.

उत्तर महाराष्ट्र

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20)...

08.24 PM

चिमूर : तालुक्‍यातील हळद उत्पादकांना नावीन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन म्हणून मिळणारे अनुदान काजळसर...

07.51 PM

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : 'अवाज वाढव डीजे,' 'झिंग झिंग झिंगाट' या गाण्याने ग्रामीण भागात धुम केली आहे. मात्र आता डीजेचा आवाज...

07.03 PM