अनाथ महिलेला सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळाला निवारा!

माणिक देसाई 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

अखेर समाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलेला समयसुचकतेने लासलगांवच्या जनार्दन स्वामी आश्रमशाळेत 'ती'चे रुपडे पालटले असल्याची घटना घडली आहे.

निफाड - गाव नाव माहित नाही, कोणी आणुन घातले याचा थांगपत्ता नाही, त्यातच आपली बोली भाषा अन् तीची भाषा यात कमालीची तफावत यामुळे काय करावे, अशी स्थिती ग्रामस्थांची झाली, गोष्ट पोलिस ठाण्यात गेली अन् अखेर समाजिक कार्यकर्त्यांनी दाखविलेला समयसुचकतेने लासलगांवच्या जनार्दन स्वामी आश्रमशाळेत तीचे रुपडे पालटले असल्याची घटना घडली आहे.

निफाड तालुक्यातील आहेरगाव येथील हनुमान मंदीरात आठ ते दहा दिवस तीचा मुक्काम होता. कोणी काही दिले तर खायचं. अंगावर मळकटलेले कपडे होते. भाषाचे पुरेसे ज्ञान नाही. हिंदी थोडे व मोजकेच शब्द बोलणे साऊथ इंडीयन असल्याचा अंदाज असलेली साधारण पस्तीत ते चाळीशीची या महिलेला कोणी आणुन सोडले? याचा थांगपत्ता नसल्याने या गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबतीत पिंपळगाव पोलिस ठाण्यात संपर्क साधला. यावरून सदर महिलेला पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पो. नि. आनंद निकम यांनी सदर महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

पोलिसांनी महिला आणली खरी पण यापुढे काय करायचं? हा प्रश्न पडला. अखेर महिला आधार संस्थेच्या रंजना मोरे यांनी याबाबतीत लासलगाव येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे दिलीप गुंजाळ यांना याबाबतीत कल्पना दिली व गुंजाळ यांनी सदर महिलेला आमच्याकडे आणुन घाला असे कळविले. यावरून पो. काॅ. रविंद्र चिणी. रंजना मोरे. पिंटु पवार आदींनी आठ दिवसांपुर्वी सदर महिला आश्रम शाळेत दाखल केली असता या आश्रमातील मुलींनी सदर महिलेला व्यवस्थित अंघोळ घालुन नवीन साडी वगैरे दिली व महिलेला खरे रूप प्राप्त झाले. आज आठच दिवसात सदर महिला थोडीफार बोलु लागली आहे. झाडझुड, कपडेधुने आदी कामात हातभार लावु लागली आहे. अनाथ आश्रमात आठच दिवसात सदर महिलेत खुप बदल होत स्वच्छता व अनेक बदल घडुन आणले आहेत. आश्रम शाळेचे संचालक दिलीप गुंजाळ व त्याचे मुलांनी केलेली या महिलेची सेवा आजच्या युगात निश्चितच कौतुकास्पद आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The orphan woman got shelter through social workers