प्रज्ञा शोध परीक्षेत सटाण्याच्या विद्यार्थ्यांचे यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

सटाणा - येथील प्रगती प्राथमिक शिक्षण संस्था संचलित प्रगती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील कु. उर्मी सुनील देवरे (इयत्ता दुसरी) व चि. यश सुरेश देसले (दोन्ही इयत्ता दुसरी) या विद्यार्थ्यांनी मंथन पब्लिकेशन्स (नगर) तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात अनुक्रमे तिसरा व पाचवा क्रमांक मिळविला आहे. 

सटाणा - येथील प्रगती प्राथमिक शिक्षण संस्था संचलित प्रगती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील कु. उर्मी सुनील देवरे (इयत्ता दुसरी) व चि. यश सुरेश देसले (दोन्ही इयत्ता दुसरी) या विद्यार्थ्यांनी मंथन पब्लिकेशन्स (नगर) तर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञा शोध परीक्षेत राज्यात अनुक्रमे तिसरा व पाचवा क्रमांक मिळविला आहे. 

उर्मी देवरे हिला १९४ गुण मिळाले असून, यश देसले याला १९० गुण मिळाले आहेत. सटाणा केंद्रात कु. अनुष्का समाधान शेवाळे (प्रथम, इयत्ता दुसरी), कु. प्रणव रवींद्र मोहन (प्रथम, इयत्ता तिसरी), कु. मयुरी मनेश शेवाळे (प्रथम, इयत्ता चौथी), कु. विनीत संजय रौंदळ (प्रथम, इयत्ता सहावी) या विद्यार्थ्यांनी प्रथम मिळवून उज्वल यश संपादन केले. सर्व विद्यार्थ्यांना एस. जे. गांगुर्डे, के. जी. डोईफोडे, रेखा देसले, व्ही. पी. भामरे, सचिन रौंदळ, निकिता सोनवणे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण येवला, शिक्षणाधिकारी पी. पी. महाजन यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 

यावेळी संस्थेचे संचालक प्रा. मुकुंद सोनजे, हेमंत बधान, रमेश येवला, राजेंद्र येवला, मुख्याध्यापक एस. बी. कोठावदे, अतुल अमृतकार, आर. बी. नेरकर, डी. ए. मोरे, सी. एम. बेडसे, बी. ए. पवार, ए. आर. अहिरे, प्राजक्ता अहिरे, व्ही. झेड. भामरे, एन. एम. सोनजे आदींसह विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. मंथन पब्लिकेशन्सतर्फे लवकरच नगर येथे आयोजित विशेष समारंभात राज्यस्तरावर क्रमांक मिळविणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. 

या परीक्षेत राज्यस्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 
मीरा गडाख (प्रथम, जिल्हा परिषद शाळा, पिंपळे जि.नाशिक), अदिती तिडके (प्रथम, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा, वडूज जि.सातारा), प्रणव ढगे (द्वितीय, जिल्हा परिषद शाळा, काळेढोन नं.१, जि. सातारा), पृथ्वीराज पिंपरे (द्वितीय, जिल्हा परिषद शाळा, लटके वस्ती, शिऊर जि.नगर), अनुप ढेरे (द्वितीय, जिल्हा परिषद शाळा, शेळकेवस्ती, कुर्डू जि.सोलापूर), साई निगुडकर (द्वितीय, सरवदे, जि.कोल्हापूर), सृष्टी बडे (द्वितीय, विद्यामंदिर, सोनाली ताळेकरवाडी जि.सिंधुदुर्ग), ओम बांगर (द्वितीय, वसुंधरा प्राथमिक शाळा, आष्टी जि.बीड)

Web Title: pardnya shodh exam education students