उन्हाळ कांद्याची उलाढाल साडेचारशे कोटींवर

उन्हाळ कांद्याची उलाढाल साडेचारशे कोटींवर

पिंपळगाव बसवंत - पिंपळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरातील अस्थिरतेमुळे आवक घटूनही यंदाच्या उन्हाळ कांद्याची उलाढाल वाढली आहे. एप्रिल ते जुलैपेक्षा ऑगस्ट ते नोव्हेंबरच्या कालावधीत आधीच आवक होऊनही कांद्याच्या दरातील चारपट तेजीमुळे पिंपळगाव समितीत सुमारे साडेचारशे कोटी रुपयांची उलाढाल झाली.

यंदा उन्हाळ कांद्याचे स्वागत घसरलेल्या दराने झाले. गेल्या वर्षी समाधानकारक पावसामुळे उन्हाळ कांद्याचे बंपर पीक आले. एप्रिल ते जुलैदरम्यान पिंपळगावला उन्हाळ कांद्याची 25 ते 30 हजार क्विंटल अशी रोजची आवक होती. आवक जोरदार असताना देशात, परदेशांतही मागणी नव्हती, त्यामुळे दीड हजार रुपये प्रतिक्विंटल दराने "यू टर्न' घेत जूनमध्ये पाचशे रुपयांचा तळ गाठला. कोसळलेल्या दराने मोठा गोंधळ उडालेला असताना ऑगस्ट हा कांदा उत्पादकांच्या अर्थकारणाला दिशा देणारा ठरला. दुबई, कोलंबो, सिंगापूरमधून कांद्याची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. त्यातच पावसाने धुमाकूळ घातल्याने कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली. नोव्हेंबरमध्ये दाखल होणारा लाल कांदाही अपेक्षित प्रमाणात बाजारात आला नाही. परिणामी गेल्या चार वर्षांतील उच्चांक मोडीत काढत दराने प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत झेप घेतली.

कालावधी --- बाजारभाव (प्रतिक्विंटल रुपयांत) ---- आवक (क्विंटलमध्ये) ---- आर्थिक उलाढाल (रुपयांत)
एप्रिल ते जुलै 2017 ------ 485 ते 1400 ----- 30,04,725 ----- 145 कोटी 48 लाख
ऑगस्ट ते 22 नोव्हेंबर 2017 --- 1500 ते 3500 ----------- 16,86,693 ----- 308 कोटी 87 लाख
उन्हाळ कांद्याची एकूण उलाढाल ः 454 कोटी 36,62,349 रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com