दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नाशिक:दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. या टोळीकडून पोलिसांनी देशी पिस्तुलासह विविध हत्यारे जप्त केली. 

शुक्रवारी (ता. 17) पहाटे सहाच्या सुमारास सरकारवाडा पोलिसांचे एक पथक गस्त घालत असताना त्यांना मेळा बसस्थानक येथील क्वार्टर्सजवळ पाच तरुण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांची झडती घेण्याचा प्रयत्न करताच यातील दोघांनी पळ काढला, तर तिघांकडे पोलिसांना एक देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे, फायटर, लोखंडी सुरा, मिरचीची पूड आणि एक दुचाकी असा ऐवज आढळल्याने तिघांनाही अटक केली.

सर्व दरोड्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले. सागर बोडके (वय 19), प्रकाश रणमाळे (18, फुलेनगर) आणि श्‍याम पाटील (19, रा. गिरणारे) अशी या अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

Web Title: police arrested 3 persons before robbery

टॅग्स