पोलिस भरती परीक्षेत 'मुन्नाभाई'चे प्रताप उघड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

जळगाव - जिल्हा पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत गुरुवारी लेखी परीक्षेदरम्यान दंडावर मायक्रोचीप व कानात इअरफोन टाकून "मुन्नाबाई एमबीबीएस' चित्रपटाप्रमाणे कॉपी करण्याच्या बेतात असलेल्या उमेदवारास पकडले. त्याच्यावर गुन्हा नोंदवत त्यास अटक करण्यात आली आहे. त्याला फोनवरून उत्तरे सांगणाऱ्या संशयिताचा शोध सुरू आहे.

जिल्हा पोलिस दलातर्फे 112 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांची आज पोलिस कवायत मैदानावर लेखी परीक्षा होती. परीक्षा सुरू झाल्यावर सकाळी पावणेसातच्या सुमारास मदन महाजन डेडवाल (वय 21, रा. जोडवाडी, जि. औरंगाबाद) हा तरुण "मेटल डिटेक्‍टर'मधून (डीएफएमडी) आत जाताना यंत्राचा "बीप' वाजला.

पोलिसांनी त्याची शारीरिक तपासणी केली. तेव्हा त्याच्या दंडाला आतून मायक्रोचीप व कानात कॉर्डलेस इअरफोन आढळला.

Web Title: police recruitment exam candidate arrested crime