दुधासाठी पोलिस संरक्षण - जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

नाशिक - दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी त्याप्रमाणे उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे मान्य केले. त्यानंतरही आंदोलन होणार असेल, तर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरतील, असा सूचक इशारा देतानाच दूध उत्पादकांच्या वाहनांना पोलिस संरक्षण दिले जाणार आहे, असे पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे सांगितले. तसेच मुंबईमध्ये गेल्या तीन दिवसांत 10 लाख लिटर दुधाचा साठा करण्यात आलेला असल्याने मुंबईला दुधाची कमतरता भासणार नाही, असाही निर्वाळा त्यांनी दिला. आंदोलकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही जानकर यांनी दिला.
Web Title: police security for milk mahadev jankar