Toor_Dal
Toor_Dal

भाव कमी केले अन तूरडाळ रेशन दुकानातून गायब झाली..

येवला - मागील चार महिने डाळ घेता का डाळ असे म्हणन्याची वेळ येत स्वस्त धान्य विक्रेत्यांना येत होती. घरचे उत्पादन व भावही थोडे जास्तच असल्याने डाळीला अल्प मागणी होती. मात्र अचानक शासनाने डाळीचा भाव ३५ रुपये किलो केला अन सर्वसामान्यांसह इतर ग्राहकही डाळीची मागणी करू लागले. मात्र मागणी तसा पुरवठ्याच्या नियमाला ब्रेक लागला अन सुरु महिन्यात जिल्ह्यातील अनेक रेशन दुकानातून तूर डाळ गायब झाली आहे.

शासनाने मागील वर्षी नोव्हेंबर शासनाने तुरडाळचे परिपत्रक काढून ५५ रुपये प्रती किलोने रेशन दुकानातून विक्रीची सक्ती केली. त्यानंतर पुरवठा विभागाकडून जबरस्तीने दुकानदाराच्या माथी तूर मारली पण किरकोळ बाजारात ७० रुपये किलोचा दर असल्याने रेशनच्या डाळीकडे शिधापत्रिकानी पाठ फिरवली होती. जिल्ह्यात तुरीचे पिक पिकत असल्याचे सबळ कारणही यामागे होते. तरीही सक्तीने दिली जाणारी डाळ रेशन दुकानदार जबरदस्तीने विक्री करावी लागली.मात्र सलग चार महिने डाळीला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला.अल्प प्रतिसादामुळे म्हणा किवा इतर कारणाने पण जुलै महिन्यात शासनाने शिधावाटप दुकनात ३५ रुपये दराने तूर डाळ उपलब्ध केली आणि मागणी वाढली.त्यातच श्रावण महिन्यासह गणेशउत्सव आल्याने डाळीची मागणी वाढणार होती.भाव कमी झाल्याने रेशनदुकानदारासह गरजू ग्राहकही सुखावले होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या धान्यासोबत जिल्यातील दोन-तीन तालुके वगळता इतर भागात तुरडाळ आलीच नसल्याचे चित्र आहे.

येवल्यात फक्त ९९० क़्वि.डाळ 
येथे मागील पाच महिन्यात फक्त ९९० क़्विटल डाळ विक्री झाली असून जिल्ह्यातही असेच चित्र आहे.प्रतीकार्ड १४ किलो डाळ देय आहे मात्र मागणीअभावी एकच किलो डाळ दिली गेली.ग्रामीण भागात तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने मागणी कमी होती पण येवल्यात मात्र मागणी असतेच.

आकडे बोलतात..
*येवल्यातील एकूण रेशन दुकान - १४०
*एकूण कार्डधारक - ५४ हजार
*महिन्याकाठी आवश्यक डाळ - ५५० क़्वि.
*तालुक्याला मिळालेली डाळ : डिसेंबर - २२० क़्वि.,मार्च -२२० क़्वि.,एप्रिल - २५० क़्वि.,जून -५० क़्वि.,जुलै - २५० क़्वि.
*आतापर्यंत मिळालेली एकूण डाळ - ९९० क़्वि.

“रेशन दुकानदारांना सुरुवातीला डाळ पुरवठा विभागाने अनिवार्य केल्याने आम्ही ती ग्राहकांना दिली.आता सन उत्सव आल्याने व भाव कमी केल्याने शहरी भागातून डाळीला मागणी वाढली आहे. आम्ही मागणीही रीतसर नोंदवली आहे. मात्र या महिन्यात डाळ मिळाली नाही.येवल्याचा विचार करता महिन्याला एक हजार क़्विटल डाळ मिळायला पाहिजे.”
-बाबुशेठ कासलीवाल, अध्यक्ष, येवला तालुका रेशन दुकानदार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com