व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 'आधार' गरजेचा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नाशिक - जेईई मेन परीक्षेला अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक सक्‍तीचा केला असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच आता अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसह सर्व व्यावसायिक पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही आता आधार कार्ड क्रमांकाची आवश्‍यकता भासणार आहे.

राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे विद्यार्थ्यांना आवश्‍यक कागदपत्रांविषयीचे माहितीपत्रक जारी करण्यात आले असून, या यादीत पहिल्या क्रमांकावर आधार कार्डाबाबतची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांनी आधी आधार कार्डाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक झाले आहे. सध्या सुरू असलेल्या 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात अभ्यासक्रमनिहाय प्रवेशाचे वेळापत्रक जारी करण्यात आले होते. केंद्र सरकारने आधार कायदा 2016 मध्ये सुधारणा केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी आधार कार्डाची आवश्‍यकता असल्याचे जाहीर करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील व्यावसायिक पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली कागदपत्रे प्राप्त करून घ्यावी, अशा आशयाचे माहितीपत्रक तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे 8 डिसेंबरला जारी करण्यात आले आहे.
 
Web Title: Professional courses for admission aadhar card important