रेल्वेरूळाचे काम युद्धपातळीवर सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पाचोराबारीतील मायलेकी अद्यापही बेपत्ता; मदतकार्य जोरात
नंदुरबार - पाचोराबारी (ता. नंदुरबार) येथे १० जुलैच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे आलेल्या पुरात नुकसान झालेल्या रेल्वेरूळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रेल्वेचे शेकडो कामगार या कामात जुंपले आहेत. येत्या २४ तासांत रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत असून, उद्या (ता. १३) हा मार्ग वाहतुकीस खुला होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, या पुरात वाहून गेलेल्या मायलेकीचा शोध आजही सुरूच होता. येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध संस्था, संघटना पुढे येत आहेत.

पाचोराबारी येथे ढगफुटीमुळे काल (ता. ११) हाहाकार माजला. येथील राधाबाई मल्लू पवार (२६), त्यांची मुलगी शीतल (१०) या दोघी बेपत्ता आहेत. कालपासून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आज दिवसभर शोध घेण्यात आला. हा नाला पुढे ज्या भागातून जातो, त्या त्या गावातही शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक गठित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. मदतीसाठी आज दिवसभरात विविध संस्था संघटनांनी पाचोराबारीला भेट दिली. त्यातून मदत उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. कालपासून या गावात चादर, ब्लॅंकेट, खाद्यपदार्थ आदींचे वाटप करण्यात आले.

पाण्याच्या प्रवाहात रेल्वे मार्गावरील पूल तुटला आहे. त्यामुळे सुरत नंदुरबार पॅसेंजरचे दहा बोगी क्षतीग्रस्त झाले, पैकी पाच बोगी रुळावरून घसरल्या. या मार्गावरील रूळाखालील भाग खचला आहे.

उद्यापर्यंत वाहतूक सुरळीत
घटनेच्या  काही वेळानंतर लगेचच रेल्वेच्या कामास प्रारंभ करण्यात आला. उद्या (ता.१३) दिवसभरात काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होण्याची शक्‍यता रेल्वे सूत्रांनी वर्तवली.

Web Title: Railway track start work on a war-footing