विजेने पळविले राजमानेचे तोंडाचे पाणी

दीपक कच्छवा
रविवार, 8 एप्रिल 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाने (ता.चाळीसगाव) गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी चक्क एक किलोमीटर पायपीट करावी लागत असून महिलांचे खुप हाल होत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तो  तातडीने सोडवावा, आशी मागणी होत आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) :चाळीसगाव शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाने (ता.चाळीसगाव) गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठी चक्क एक किलोमीटर पायपीट करावी लागत असून महिलांचे खुप हाल होत आहेत. पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तो  तातडीने सोडवावा, आशी मागणी होत आहे.

 राजमाने गावाची लोकसंख्या सुमारे बाराशेच्या घरात असुन, एप्रिल महिन्यात सुरवातीलाच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.जवळच असलेल्या   कळमडु ग्रामपंचायतीला हे गाव जोडलेले आहे.या गावासाठी  मेहुणबारे येथील गिरणा नदीवरून जिल्हा परिषदेची पाण्याची योजना आहे.मात्र या योजनेचे विज बिल थकल्यामुळे राजमाने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासुन गेल्या अनेक दिवसापासुन वंचित राहावे लागत आहे.मात्र  हे वीजबिल एकट्या राजमाने गावाकडे नसुन कळमडु गावाकडेही असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

राजमाने गावात पिण्याचे पाणी नसल्याने ग्रामस्थांसह महिलांना एक किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.हे पाणी पिण्यायोग्य नाही. काही विहिरींचे पाणी दूषित असल्याने साथीचे आजाराची लागण होत आहे.मात्र सध्याच्या पाणीटंचाई काळात दुसरा पर्याय नसल्याने ग्रामस्थांना नाईलाज झाला आहे.सध्या पाणी आणतांना रेल्वे पुलाखालून येतांना महीलांना चिखलातून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.त्यामुळे येथील पाणीप्रश्न  तातडीने सोडवावा आशी मागणी महिलांमधुन होत आहे.

पाण्यासाठी जीव घेणी कसरत 
पाणी नसेल तर महीलांना घरात काहीच काम सुचत नाही.परंतु डोक्यावर हंडा घेवुन महीला घराच्या बाहेर पडतात. गावाच्या बाहेर असलेल्या विहीरीत खाली उतरून पाणी भरावे लागते.ती विहीर सुमारे चाळीस फुट खोल आहे.परंतु त्या विहिरीला वरच पाणी असल्याने अक्षरश महीला विहीरीत उतरून पाणी भरतात. तर काही महीला विहीरीच्या कडेला उभ्या राहुन पाण्याचा हांडा घेतात अक्षरश ही जीवघेणी कसरत महीलांना करावी लागत आहे.

आमच्या ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची 80  टक्के पाणीपट्टी  भरलेली आहे. जिल्हा परिषदेने वीजवितरण कंपनीला पैसे न भरल्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे  विज पुरवठा  वीजवितरण कंपनीने कट केला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेने वीजबिल भरून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
कविताबाई पाटील (सरपंच, कळमडु ग्रामपंचायत)

जवळपास कुठेही पाणी नसल्याने आम्हा महीलांना दुरवर भटकंती करून पाणी आणावे लागते.भर उन्हात पायपीट करावी लागते.दुरवरून पाणी आणतांना आम्हा महिलांचे खुप हाल होतात.प्रशासनाने आमची पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
- सुमनबाई पटाईत

दुषित पाण्यामुळे आजार जडतात 
विहिरीचे पाणी दुषित असल्याने सर्दी , खोकला, ताप, यासारखे साथीचे आजार होत आहेत.त्यामुळे प्रशासनाने आम्हाला शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे.जेणकरून आमचे आरोग्य चांगले राहील.कीमान आमचा पाण्याचा तरी प्रश्न सोडवावा.
- तुषार पाटील 

Web Title: rajmane village pending electric bill water issue