रेशन धान्य वितरण मार्चअखेर ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - शासकीय गुदाम ते रेशन दुकानापर्यंतच्या धान्याचा प्रवास ऑनलाइन झाल्याने "एसएमएस'द्वारे प्रत्येक टप्प्यावरील नोंदी मिळत आहेत. शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळाल्याची "एसएमएस' व्यवस्था मार्चअखेरपर्यंत कार्यान्वित होणार आहे. "ई-पीओएस' प्रणालीमुळे धान्य वितरणातील काळाबाजार संपुष्टात येईल, असा विश्‍वास अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी व्यक्त केला. 

पाठक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन नाशिक विभागातील पुरवठा विभागाचा आज आढावा घेतला. पुरवठा उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी, धान्य वितरण अधिकारी उपस्थित होते. धान्य वितरण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी ऑनलाइन व्यवस्थेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिधापत्रिकेतील फरक जुळवून घेणे, अधिकाऱ्यांना ई-पीओएस प्रणालीचे प्रशिक्षण देणे, ई-पीओएस अंमलबजावणीतील त्रूटी दूर करणे, प्रत्यक्ष कार्यरत रास्तभाव दुकानांची संख्या, एकूण शिधापत्रिकांची व सदस्यांची संख्या आदींचा आढावा त्यांनी घेतला. 

मार्च डेडलाइन 
नाशिक विभागात तीन टप्प्यात ऑनलाइन यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. ई-पीओएस प्रणालीच्या पूर्वतयारीनंतर पाठक म्हणाले, की बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणासाठी ई-पीओएस मशिनचा वापर मार्चअखेर जिल्ह्यात सुरू होईल. ऑनलाइन धान्य पुरवठा प्रणाली नाशिक विभागात तीन टप्प्यांत राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात नंदुरबार, दुसऱ्या टप्प्यात जळगाव व तिसऱ्या टप्प्यात नाशिक, धुळे व नगर जिल्ह्यांत ही प्रणाली कार्यान्वित होईल. जिल्ह्यात काही रास्तभाव दुकानदारांना प्रायोगिक तत्त्वावर ई-पीओएस मशीन धान्य वितरणासाठी दिले आहे. 

शिधापत्रिकाधारक आता बॅंक एजन्ट 
रेशन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी बॅंकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पॉंडन्स) म्हणून काम करण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बॅंकेच्या ठेवी गोळा करणे, कर्जदार शोधणे व कर्ज वसुलीचे काम मिळणार असून, या कामाबद्दल त्यांना मानधन मिळणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन या बैठकीनंतर दिले.

Web Title: Ration distribution online