धोकादायक उद्योगांच्या सुरक्षिततेकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळाच!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार

कार्यालय नागपूरला; जळगावला केवळ ‘ना हरकत’ दाखल्याचा अधिकार
जळगाव - जिल्ह्यात शिरसोली (ता. जळगाव), पारोळा, रुईखेडा (ता. मुक्‍ताईनगर) येथे फटाके तयार करण्याचे कारखाने आहेत. सोबतच गॅस रिफिलिंग प्लान्ट, गॅस गुदाम, केमिकल फॅक्‍टरीज, पेट्रोलपंप आहेत. हा व्यवसाय करताना थोडाजरी निष्काळजीपणा केला, तर अनेकांच्या जिवावर बेतू शकते. या धोकादायक उद्योगांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हामुळे आग लागून मोठी दुर्घटना घडू शकते. यामुळे उन्हाळ्यात दुर्घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या आहेत किंवा नाहीत, याची तपासणी धोकादायक उद्योगांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली, तरच भविष्यातील दुर्घटना टाळता येतील.

फटाके कारखान्यात विशेषतः दिवाळीपूर्वी एक- दोन महिने अगोदरच सुरक्षिततेबाबत तपासणी केली जाते. फटाके कारखान्यांना परवानगी देण्याचे अधिकार नागपूर येथील विस्फोटक व सुरक्षा विभागाच्या कार्यालयाला आहेत. महसूल प्रशासनाला केवळ ‘ना हरकत’ दाखला देण्याचे अधिकार आहेत. मंगळवारी (ता. २) शिरसोली येथील ‘श्‍यामा फायर वर्क्‍स’मध्ये सुरक्षिततेबाबत उपाययोजनांची पाहणी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केली असती, तर दुर्घटना टळू शकली असती, असे नागरिकांमध्ये बोलते जात आहे.
 

रासायनिक कंपनीत अशी घ्यायला हवी खबरदारी
ॲसिड कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थांसह काम करत असताना सुरक्षितता चष्मा घाला.
प्रशिक्षणार्थींना ताबडतोब कुठल्याही काचेच्या वस्तूची भांडी किंवा रासायनिक स्फोटांबद्दल लगेच माहिती द्या. जेणेकरून स्वच्छता प्रक्रिया पूर्ण करता येईल.
कोणत्याही द्रवपदार्थावर pipeting तेव्हा pipet fillers वापरा. खोलीत द्रवपदार्थ असलेले पाइप वापरू नका.
गरम काचेच्या वस्तू हाताळताना उष्णता-प्रतिरोधक हातमोजे, चिमटे वापरा.
त्वचेच्या संपर्कापासून बचाव करण्यासाठी कोणतीही धोकादायक सामग्री हाताळताना प्लास्टिकच्या हातमोजे वापरा.
चाचणी नळ्या किंवा डिशेसपासून सर्व न वापरलेले सूक्ष्म जिवाणू मीडिया रिकामी करा. जेणेकरून ते निष्कर्षापूर्वी निर्जंतुकीकरण करता येईल.
संसर्गापासून बचाव करण्यासाठी साठवण, काचेच्या वस्तू, स्टोरेजसाठी स्वच्छ ठेवण्यापूर्वी आणि साफसफाई करण्यापूर्वी सर्व साफ करा.
 

शिवकाशी येथे अनेक फटाके कारखाने आहेत. तेथे आगीच्या घटना घडतात. जळगाव जिल्ह्यात फटाके कारखान्यात नियमानुसारच सुरक्षिततेबाबत काळजी घेतली जाते. संबंधित अधिकारीही तपासणी करतात.

- युसूफ मकरा, मकरा एजन्सी
 

सिलिंडर गुदामात आम्ही ठरवून दिलेल्या स्टॉकव्यतिरिक्त सिलिंडर ठेवत नाही. ‘फायर फायटर’ बॉटल ठेवलेल्या असतात. वाळू, मातीने भरलेल्या बादल्याही असतात. यामुळे गळती, आगीची घटना घडताच त्यावर नियंत्रण मिळविता येते.

- दिलीप चौबे, संचालक, रेखा गॅस एजन्सी
 

फटाका उद्योगात अशी हवी दक्षता
हा उद्योग मंदिर, पेट्रोलपंपापासून पाचशे मीटर अंतरावर असावा.
कारखान्याजवळ कोणत्याही प्रकारचा रहिवास नको.
उन्हाळ्यात सावलीच्या वेळीच फटाक्‍यांसाठी दारू बनविणे.
कामगारांनी बाहेर येताना ॲल्युमिनिअम प्लेटला हात लावावा.
कारखान्यातील रूमचे दरवाजे एकमेकांच्या विरुद्ध असावेत.
कोणतेही वाहन कारखान्याबाहेरच ठेवावे.
वाहन सुरू असताना फटाके वाहनात ठेवू नयेत.
दोन रूमचे अंतर दीड मीटर असावे.
रूमला खिडक्‍या स्टीलच्या व बाहेर उघडणाऱ्या असाव्यात.
रूमला व्हेंटिलेटर ‘झेड’ आकाराचे हवे.

गॅस, पेट्रोल अशी हवी दक्षता
गॅस सिलिंडर वाहनात भरताना सील योग्य असल्याची खात्री करणे.
ज्वालाग्राही पदार्थ गॅस गुदाम, पेट्रोलपंपाजवळ न नेणे.
गॅस गुदामाजवळ फायर फायटर बॉटल, वाळूच्या बादल्या ठेवणे.
पेट्रोलपंपाजवळ ‘सीझ फायर’चे सिलिंडर भरून ठेवणे.
मदत मागावी याबाबतचे दूरध्वनी क्रमांक भिंतीवर लिहिणे.
गॅस गुदामास सुरक्षितता म्हणून वॉचमन ठेवणे.
सिलिंडर उतरविताना लांब अंतरावर उतरविणे.
सिलिंडर केव्हाही उभे ठेवावे, आडवे ठेवू नये.
(जळगावला गॅस रिफिलिंग प्लान्ट आहे. ज्वालाग्राही पदार्थ तेथे नेण्यास संधीच नसते. प्रत्येक ठिकाणी तपासणी होते.)

Web Title: Regarding the safety of dangerous industries!